मराठी बातम्या /बातम्या /देश /

हायप्रोफाइल सोसायटीच्या 7 व्या मजल्यावरुन विवस्त्र खाली पडली तरुणी, मित्रासोबत करत होती पार्टी

हायप्रोफाइल सोसायटीच्या 7 व्या मजल्यावरुन विवस्त्र खाली पडली तरुणी, मित्रासोबत करत होती पार्टी

हायप्रोफाइल सोसायटीतील 24 वर्षीय तरुणी 7 व्या मजल्यावरुन खाली पडल्याची धक्कादायक घटना (shocking incident) घडली आहे.

हायप्रोफाइल सोसायटीतील 24 वर्षीय तरुणी 7 व्या मजल्यावरुन खाली पडल्याची धक्कादायक घटना (shocking incident) घडली आहे.

हायप्रोफाइल सोसायटीतील 24 वर्षीय तरुणी 7 व्या मजल्यावरुन खाली पडल्याची धक्कादायक घटना (shocking incident) घडली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 20 डिसेंबर: दिल्ली एनसीआरला (Delhi NCR) लागून असलेल्या ग्रेटर नोएडाच्या (Greater Noida) हायप्रोफाइल सोसायटीतील 24 वर्षीय तरुणी 7 व्या मजल्यावरुन खाली पडल्याची धक्कादायक घटना (shocking incident) घडली आहे. यादरम्यान ती गंभीर जखमी (seriously injured) झाली आहे. जिथे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे तरुणी विवस्त्र अवस्थेत खाली पडली होती. तरुणीच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून ती कोमात असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

तरुणी पश्चिम बंगालची असल्याचं सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तरुणी फ्लॅटच्या खिडकीतून खाली पडली तेव्हा ती नग्न अवस्थेत होती म्हणजेच तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा- धक्कादायक...कोर्टात स्फोट करणारा आरोपी शास्त्रज्ञ प्यायला HARPIC!  

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 12 डिसेंबरची आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पश्चिम बंगालमधील पीडित तरुणी पानिपत येथून या सोसायटीत आली होती असं समोर आलं आहे. त्याच दिवशी रात्री ही तरुणी सातव्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाली.

दरम्यान पोलिसांनी सांगितलं की, तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, चौकशी करण्यात आली आहे. त्याचवेळी पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही तरुणी झोपेच्या आणि गाढ नशेत खिडकीतून पडली होती, सध्या ती कोमात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबीयांना दिली घटनेची माहिती

पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, त्यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. मात्र, आजपर्यंत त्या मुलीची विचारपूस करण्यासाठी कोणीही आलं नाही. त्याचवेळी तरुणीच्या मित्रानं चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, पीडित तरुणीसोबत माझी वारंवार भेट होत होती. ती जेव्हा कधीही इथे यायची तेव्हा त्याच्या फ्लॅटमध्ये राहायची.

पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले

पीडित तरुणीच्या मित्राने पोलिसांना सांगितलं की, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दोघांची पार्टी होती. त्याचवेळी मध्यरात्री तरुणी दारूच्या नशेत असताना बाथरूमच्या दिशेनं गेली. यानंतर ती सातव्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर रुग्णालयात पीडित तरुणी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

First published:

Tags: Delhi