Home /News /national /

22 वर्षे देशासाठी कातडं झिजवलं पण दिल्ली हिंसाचारानं जवानाला क्षणात रस्त्यावर आणलं

22 वर्षे देशासाठी कातडं झिजवलं पण दिल्ली हिंसाचारानं जवानाला क्षणात रस्त्यावर आणलं

दिल्ली हिंसाचारानंतर देशात राहण्याचा अधिकार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली

    नवी दिल्ली, 3 मार्च : केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात 22 वर्षे सेवा दिल्यानंतर 2002 मध्ये हेड कॉन्स्टेबल पदावरुन निवृत्त झालेले 58 वर्षीय आस मोहम्मद उत्तर पूर्व दिल्लीतील एका शिबिरात राहत आहेत. गेल्या आठवड्यात उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या दंगतील अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराला आग लावली. आता ते शेकडो लोकांसोबत मुस्तफाबाद येथील एका शिबिरात राहत आहेत. एनडीटीव्हीने केलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, 200 ते 300 जणांनी घरावर दगड फेकले, गोळ्या चालवल्या. यानंतर घराला आग लावली. मी घरात माझ्या 26 वर्षांच्या मुलासोबत होतो. ही परिस्थिती उद्भवताच आम्ही छतावर गेलो आणि तेथून शेजारच्या घराच्या छतावर उडी मारुन बाहेर पडलो. माझ्या भाच्याची 29 मार्च रोजी लग्न होणार होतं. यासाठी मी घरात दागिने ठेवले होते ते पण लोकांनी लुटून नेले. मोहम्मद यांनी आपली पत्नी आणि मुलाला बुलंदशहर येथे नातेवाईकांकड़े पाठविले आहे. संबंधित - दिल्ली हिंसाचारानंतर मोठी शोधमोहिम, कुठे आहे पोलिसांवर बंदूक रोखणारा शाहरुख? यासोबतच ते म्हणाले, ‘1991 मध्ये मी काश्मीरमध्ये तैनात होतो. यादरम्यान मी खूप जखमी झालो होतो. मात्र आता दिल्लीतील हिंसाचारात जे काही सुरू आहे त्यानंतर वाटतंय मला या देशात राहण्याचा अधिकार नाही’. ते भागीरथी विहार या भागात राहत होते. या भागात गेल्या आठवड्यात सर्वात अधिक परिणाम दिसून आला होता. या भागात चार दिवसांपर्यंत हल्लेखोर लोखंडीची रॉड, दगड आणि हॉकी स्टिक घेऊन फिरत होते. येथे जमावाने लोकांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 हून अधिक लोक जखमी आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या