श्रीनगर, 31 डिसेंबर: ऑटो, बस आणि ट्रकच्या महिला चालक (woman driver) अनेकदा बातम्यांचा विषय बनलेल्या आपण वाचत असतो. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) मात्र आजवर एकही महिला बस ड्रायवर नव्हती. जम्मू-काश्मीरच्या पूजा देवीनं (Pooja Devi) काश्मीरची पहिली महिला बस ड्रायव्हर बनत इतिहास घडवला आहे. हा इतिहास घडवण्याचा रस्ता मात्र खाचखळग्यांनी भरलेला होता. एखाद्या महिलेनं ठरवलं, तर ती काहीही करून दाखवू शकते हेच पूजानं आपल्या वास्तव यशकथेतून दाखवून दिलं आहे. पूजा कधी लहान मुलांच्या बाहुल्या-भातुकलीच्या खेळात रमली नाही. तिला लहानपणीपासूनच मोठ्या गाड्या चालवण्याचा छंद होता. खूप मोठा संघर्ष करून ती आज या शिखरावर पोचली आहे.
#poojaMakeHistory
— Mr.Gopu 🇮🇳 (@gopu_india) December 25, 2020
When Pooja Devi ferried passengers in a private bus from Kathua to Jammu on Thursday, this mother of two became Jammu and
Kashmir’s first woman bus driver. pic.twitter.com/k8E4BIfuN2
कठुआ मार्गावर चालणाऱ्या बसचं स्टिअरिंग पूजाच्या हाती आलं ते या महिन्याच्या २३ तारखेला. तिला बस चालवताना पाहून लोक थक्क झाले. काही वर्षांपूर्वी ड्रायव्हिंग शिकण्यासाठी पूजानं काही वर्षांपूर्वी टॅक्सी चालवली. नंतर तिनं जम्मूमध्ये ट्रक चालवला. आता ती स्थानिक ट्रान्सपोर्ट सर्विसमध्ये बस चालवते आहे. ती जास्त शिकलेली नाही. मात्र तिला वाटतं, की हेच ते काम आहे जे तिला आनंद आणि सन्मान दोन्ही मिळवून देतं. पूजा सांगते, “हे सगळं प्रत्यक्षात उतरवणं माझ्यासाठी इतकं सोपं नव्हतं. माझ्या कुटुंबासह पतीसुद्धा यासाठी अजिबातच तयार नव्हता. मग मी बंद केलं आणि एकटीच निघाले. पहिल्यांदाच बस चालवली तेव्हा झालेल्या आनंद एकदम शब्दात सांगण्यापलिकडचा आहे. टॅक्सी आणि ट्रक मी आधीही चालवलेत. मात्र बस कुणी चालवायला देईल असं वाटत नव्हतं. हे माझं स्वप्न होता. ते पूर्ण झाल्याचं फिलिंग खूप खास आहे. मी काही फार मोठी स्वप्नं पाहत नाही. पण ड्रायव्हिंगबाबतचं स्वप्न खूप मौल्यवान होतं माझ्यासाठी. आता इतर महिलांनाही ड्रायव्हिंग शिकवण्याची माझी इच्छा आहे.”