जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

दिल्लीतील मालवीय नगरमध्ये ‘बाबा का ढाबा’ (Baba Ka Dhaba) चालवणारे कांता प्रसाद (Kanta Prasad ) यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 जून : दिल्लीतील मालवीय नगरमध्ये ‘बाबा का ढाबा’ (Baba Ka Dhaba) चालवणारे कांता प्रसाद (Kanta Prasad ) यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना तातडीनं दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला ? याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचाी तपास सुरु केला आहे. दिल्लीतील मालवीय नगर भागातील बाबा का ढाबा (Baba Ka Dhaba) चालवणाऱ्या 81 वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बादामी देवी यांचं नशीब एक व्हायरल व्हिडिओमुळे पूर्णतः पलटून गेलं होतं. ट्विटरवर ते टॉप ट्रेंडमध्ये होते. इतकंच नाही तर त्यांच्या ढाब्याबाहेर लोकांची अक्षरशः लाईन लागण्यास सुरुवात झाली होती. अनेकांनी त्यांना आर्थिक मदतही केली होती. यातूनच कांता प्रसाद (Kanta Prasad) यांनी रेस्टॉरंट सुरू केलं होतं. कांता प्रसाद यांचं रेस्टॉरंट फेब्रुवारीमध्ये बंद झालं आहे. आता ते पुन्हा आपल्या ढाब्याकडे परतले आहेत. मात्र, आता आधीसारखी कमाई होत नाही.  दिल्लीतील लॉकडाऊनचा फटका त्यांना बसला होता. त्यामुळे, आता पुन्हा एकदा त्यांना गरीबीचा सामना करावा लागत होता. ‘लॉकडाऊनमुळे आमची दैनंदिन कमाई 3,500 रुपयांवरुन घटून 1,000 रुपयांवर आली आहे. हे कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसं नाही’, अशी माहिती त्यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. बापरे! आंब्याच्या रक्षणासाठी 4 गार्ड अन् 6 श्वान तैनात, वाचा काय आहे कारण यू-ट्यूबर गौरव वासन याच्यामुळे बाबा का ढाबा लोकप्रिय झाला होता. वासननं ढाब्याच्या व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता. मात्र, काही काळानंतर कांता प्रसाद यांनीच वासन आणि त्याच्या सहकार्यांवर दान म्हणून मिळालेल्या पैशाचा दुरुपयोग आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात