केजरीलावांच्या दिल्ली विजयाचा महाराष्ट्रात इफेक्ट; मोफत वीज, पाणी मागणीने धरला जोर

केजरीलावांच्या दिल्ली विजयाचा महाराष्ट्रात इफेक्ट; मोफत वीज, पाणी मागणीने धरला जोर

दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने पाणी, वीज आणि महिला सुरक्षेबाबत केलेलं काम 'आप'च्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले.

  • Share this:

मुंबई, 11 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसला धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दिल्लीची निवडणूक दिल्लीच्याच प्रश्नांवर झाली पाहिजे, हे केजरीवाल यांनी आग्रहाने आणि आक्रमकपणे मांडलं. परिणामी निवडणुकीत कलम 370, शाहीनबाग हे भाजपकडून मांडण्यात आलेले मुद्दे प्रभावी ठरले नाहीत आणि आम आदमी पार्टीने मोठा विजय मिळवला.

दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने पाणी, वीज आणि महिला सुरक्षेबाबत केलेलं काम 'आप'च्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे आता महाराष्ट्रातही याबाबतची मागणी जोर धरू लागली आहे. 'ज्याप्रकारे दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी वीज, पाणी आणि मोहल्ला क्लीनिक या योजना फ्रीमध्ये राबवल्या तशाच प्रकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा,' अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे.

'मी मोफत वीज आणि पाण्याच्या योजनेबाबत अर्थमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यांना पत्रही लिहिणार आहे. तसंच विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करणार आहे. अशा प्रकारचा निर्णय झाल्यास सरकारची लोकप्रियता वाढेल,' असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

मोफत वीज देण्यावरून झाले आहेत सरकारमध्ये मतभेद

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या सरकारने मोफत वीज देत दिल्लीच्या नागरिकांना दिलासा दिला. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारही 100 युनिटपर्यंतची वीज मोफत करण्याचा विचार करत आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत माहिती दिली. मात्र या निर्णयावरून सरकारमध्येच मतभेद झाल्याचं उघड झालं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारने असे फुकटचे धंदे करू नयेत, असं म्हणत वीज मोफत देण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र उर्जामंत्री नितनी राऊत यांची पाठराखण केली आहे.

'नितीन राऊत हे याबाबत अभ्यास करत आहेत. गरीबांना मोफत वीज देता येईल का, याबाबत विचार सुरू आहे. मला वाटतं चाचपणी करणे गैर नाही,' असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

First published: February 11, 2020, 5:04 PM IST

ताज्या बातम्या