• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Delhi Air Pollution: प्रदूषणामुळे राजधानी Delhi ची परिस्थिती वाईट, शाळा-महाविद्यालय बंद; ट्रॅकना प्रवेश बंदी

Delhi Air Pollution: प्रदूषणामुळे राजधानी Delhi ची परिस्थिती वाईट, शाळा-महाविद्यालय बंद; ट्रॅकना प्रवेश बंदी

Delhi Air Pollution: प्रदूषणाच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम शाळा आणि महाविद्यालयांवर झाला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: राष्ट्रीय राजधानी दिल्ली (Delhi) आणि नॅशनल कॅपिटल रिजन (NCR) मध्ये प्रदूषणाच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम शाळा आणि महाविद्यालयांवर झाला आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे या नोव्हेंबरमध्ये उघडलेल्या शाळा (School) आणि महाविद्यालयं (College) काही दिवसातच पुन्हा एकदा ऑनलाईन स्थलांतरित करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या (Central Government) एका पॅनलनं म्हटलं की, दिल्ली-NCR मधील सर्व शाळा बंद राहतील. एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने (CAQM) दिल्ली आणि त्याच्या लगतच्या भागातील प्रदूषणाची परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. (Delhi government on ways to tackle air pollution) CAQM नं म्हटलं आहे की, 21 नोव्हेंबरपर्यंत किमान 50 टक्के अधिकाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी. यासोबतच खासगी कार्यालयांमध्येही अशी व्यवस्था करण्यात यावी. आयोगानं 21 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत येणाऱ्या सर्व ट्रकच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. हे निर्बंध केवळ अनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या ट्रकवर लागू असेल. यासह मेट्रो, संरक्षण, विमानतळ वगळता सर्व प्रकारच्या बांधकामांवर 21 नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीचा AQI पुन्हा खराब मंगळवारी, दिल्लीच्या हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा 'गंभीर' श्रेणीत गेली आहे आणि 24 तासांचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 403 वर नोंदवला गेला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत ते 'अत्यंत गरीब' श्रेणीत होते आणि 396 नोंदवले गेले. गाझियाबादमध्ये दुपारी 4 वाजता AQI 369, ग्रेटर नोएडामध्ये 361, गुरुग्राममध्ये 369 आणि नोएडामध्ये 397 एक्यूआय नोंदवण्यात आले. ते 'अतिशय गरीब' श्रेणीत येते. हेही वाचा- राज्यावर पुन्हा एकदा पावसाचं सावट, तीन दिवस 'या' जिल्ह्यात पावसाचा इशारा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण 'SAFAR' नुसार, AQI बुधवारीही 'गंभीर' श्रेणीत राहील. नोव्हेंबरपर्यंत ते 'गंभीर' किंवा 'अतिशय गरीब' श्रेणीत राहील. AQI शून्य आणि 50 दरम्यान 'चांगला', 51 आणि 100 दरम्यान 'समाधानकारक', 101 आणि 200 दरम्यान 'मध्यम', 201 आणि 300 दरम्यान 'खराब', 301 आणि 400 दरम्यान 'अत्यंत खराब' आणि 401 आणि 500 ​​च्या दरम्यान गंभीर मश्रेणीत मानले जाते. दिल्ली सरकारने ही केली घोषणा यापूर्वी राज्यातल्या प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी, दिल्ली सरकारनं सोमवारपासून एक आठवडा शाळा बंद, बांधकामाच्या कामकाजावर बंदी आणि सरकारी कर्मचार्‍यांसाठी घरातून काम करण्याचं धोरण यासह अनेक आपत्कालीन उपाय जाहीर केले होते. हेही वाचा- हृदयद्रावक! सासरच्या मंडळीच्या छळानं घेतला बापलेकीचा जीव; पित्याच्या आत्महत्येनंतर मुलीनंही सोडला प्राण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रदूषण रोखण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.
  Published by:Pooja Vichare
  First published: