• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: आज सलग सहाव्या दिवशी सोने दरात घसरण, जाणून घ्या काय आहे गोल्ड रेट

Gold Price Today: आज सलग सहाव्या दिवशी सोने दरात घसरण, जाणून घ्या काय आहे गोल्ड रेट

आज सलग सहाव्या दिवशी सोने दरात कमी आली आहे. तर चांदीचा दरही कमी झाला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज आठवड्याच्या शेवटी सोने-चांदी दर घसरणीसह ट्रेड करत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 जुलै: सोने-चांदी दरातील घसरण आजही कायम आहे. आज सलग सहाव्या दिवशी सोने दरात कमी आली आहे. तर चांदीचा दरही कमी झाला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज आठवड्याच्या शेवटी सोने-चांदी दर घसरणीसह ट्रेड करत आहे. एमसीएक्सवर सोनं 0.20 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. तर चांदीचा दरही 0.02 टक्के कमी झाला आहे. मागील काही दिवसांच्या घसरणीमुळे सोने दर रेकॉर्ड लेवलपासून अतिशय कमी झाला आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,000 रुपयांहून अधिक उच्चांकी स्तरावर होता. एमसीएक्सनुसार आज सोनं 47,541 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. म्हणजेच रेकॉर्ड स्तरावरुन सोनं 8,500 रुपयांजवळपास स्वस्त आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑगस्ट डिलीव्हरी गोल्डची किंमत आज 0.20 टक्के घसरणीसह 47,541 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे, तर चांदीचा दरही काहीसा घसरला आहे. चांदीचा दर 0.02 टक्के घसरणीसह 67,360 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे आणि अमेरिकन बाँड यील्डमध्ये झालेल्या वाढीमुळे सोन्याचे दर उतरले असल्याची जाणकारांची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर उतरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या दरावर देखील झाला आहे.

  (वाचा - व्यक्तीच्या मृत्यूनंतर Aadhaar-PAN, पासपोर्ट, वोटर आयडीचं काय होतं? पाहा डिटेल्स)

  अशी तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
  Published by:Karishma
  First published: