Home /News /national /

मुलीच्या वाढदिवशी कोरोना संक्रमित आईचा मृत्यू; शेवटच्या क्षणापर्यंत लेकीसाठी तडफडत राहिली

मुलीच्या वाढदिवशी कोरोना संक्रमित आईचा मृत्यू; शेवटच्या क्षणापर्यंत लेकीसाठी तडफडत राहिली

कोरोनाबाधित 33 वर्षीय नम्रता जैन हिने आपल्या दत्तक घेतलेल्या मुलीला आठवत अखेरचा श्वास घेतला.

    ग्वाल्हेर, 25 जानेवारी : मुलीच्या वाढदिवशीच आईने जगाचा निरोप घेतला. डोळ्यात पाणी घालणारी ही गोष्ट ग्वाल्हेरच्या नम्रता जैनची आहे. मृत्यू नम्रताच्या दाराशी उभा होता, ती मात्र आपली लेक मान्यासाठी तडफडत होती. पण मान्या आली नाही. मरण आले. कोरोनाबाधित 33 वर्षीय नम्रता जैन हिने आपल्या मुलीला आठवत अखेरचा श्वास घेतला. नम्रता यांच्या दत्तक मुलीचा दुसरा वाढदिवस होता. दुर्दैवाने त्याच दिवशी 24 जानेवारी रोजी तिचं निधन झाले. नम्रता ही कॅन्सरची रुग्ण होती. फुफ्फुसात पाणी भरल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली. नम्रताने मूल नाहीये. दीड वर्षांपूर्वी स्वत:च्या बहिणीकडून 24 दिवसांची मुलगी दत्तक घेतली होती. अचानक डिसेंबरमध्ये बहिण आली आणि मुलीच्या अपहरणाचा आरोप लावत मुलीला घेऊन गेली. तेव्हापासून नम्रता तणावात होती. नम्रताची कहाणी वाचताना हृदय पिळवटून निघतं. डीडी नगर निवासी नम्रताचा पती शशिकांत जैनने मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी नम्रताला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती केलं होतं. शशिकांतने सांगितलं की, 24 जानेवारी रोजी नम्रताची तब्येत खूप जास्त बिघडली. याच दिवशी मान्याचा वाढदिवस होता. ती सतत तिची आठवण काढत होती. रात्री 12.30 अचानक तिने बोलणं बंद केलं. ती शांत झाली होती. हे ही वाचा-72 वर्षांच्या आजी अवघ्या दीड रुपयांना विकतात इडली; 'या' कारणासाठी करतात व्यवसाय मानलेल्या बहिणीकडून 24 दिवसांच्या मुलीला दत्तक घेतलं... शशिकांतने सांगितलं की, नम्रताची मानलेली बहीण अंजलीकडून दोन वर्षांपूर्वी सहारनपूरमध्ये भेट झाली होती. तेथे जैन समाजाचा कार्यक्रम सुरू होता. बऱ्याच दिवसांनंतर ही भेट झाली होती. अंजली गर्भवती होती. तिला आधीच दोन मुली होत्या. बोलता बोलता नम्रताला बाळ दत्तक घ्यायचं असल्याचं समोर आलं. यावेळी अंजलीने तिसरी मुलगी दत्तक देण्याचं वचन दिलं. अंजलीची तिसरी मुलगी 24 दिवसांची होती, तेव्हा 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कायदेशीर कारवाई करीत मुलीला दत्तक घेतलं. आम्ही तिचं नाव मान्या ठेवलं. मान्याचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. मुलगी दीड वर्षाची झाल्यावर तिच्या बहिणीने मुलगी परत मागायला सुरुवात केली. त्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 8 डिसेंबर 2021 रोजी अंजली पोलिसांसह आली आणि मुलीला जबरदस्तीने घेऊन गेली. यानंतर नम्रता तुटून गेली. आणि यानंतर ती आजारी राहू लागली. नम्रतालादेखील ती लहान असताना एका नातेवाईकांकडून दत्तक घेण्यात आल्याचं तिच्या पतीने सांगितलं.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Adoption, Madhya pradesh, Mother

    पुढील बातम्या