Home /News /national /

लडाखमध्ये चिनी सैन्याशी लढताना आलं वीरमरण; 15 दिवसांच्या लेकीचा चेहरा पाहायची इच्छा अखेर राहिली

लडाखमध्ये चिनी सैन्याशी लढताना आलं वीरमरण; 15 दिवसांच्या लेकीचा चेहरा पाहायची इच्छा अखेर राहिली

लडाखमध्ये चिनी सैनिकांविरोधात झालेल्या हिंसक चकमकीत कुंदन कुमार ओझा यांना वीरमरण आलं.

    साहिबगंज, 16 जून : लडाखमध्ये चिनी सैनिकांविरोधात झालेल्या हिंसक चकमकीत मुफस्सिल पोलीस स्टेशन परिसरातील डिहारी गावातील कुंदन कुमार ओझा यांना वीरमरण आलं. रविशंकर ओझा यांच्या तीन मुलांपैकी कुंदन कुमार हे दुसरे होते. जवळपास सात वर्षे ते भारतीय सैन्यामध्ये राहून देशाची सेवा करीत होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबीयांना कुंदन शहीद झाल्याची माहिती मिळाली. यानंतर गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. सुमारे 15 दिवसांपूर्वीच कुंदन कुमार ओझा यांना मुलगी झाली होती. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. मुलीला पाहण्यासाठी कुदंन आतूर होते. मात्र त्यांना लेकीचा चेहराही पाहता आला नाही. तब्बल दोन वर्षांपूर्वी कुंदन यांचा विवाह सुल्तानगंजमधील मिरहट्टीत राहणाऱ्या नेहासह झाला होता. कुंदन यांचे मोठे बंधू मुकेश कुमार ओझा धनबाद तर लहान भाऊ कन्हैया ओझा गोड्डा मध्ये एका खासगी कंपनीत काम करतात. मंगळावारी कुंदन यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा घरात त्यांचे आई-वडील, पत्नी, वहिनी होती. कुंदन यांनी दुबौलीत दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतरचं शिक्षण घेण्यासाठी ते साहिबगंज येथे गेले. कुंदन यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते तीन ते चार महिन्यांपूर्वी गावी आले होते. ते 16 दानापूर रेजिंमेटचे जवान होते. 2011 मध्ये राचीमध्ये भर्ती कॅम्पमध्ये त्यांची निवड झाली होती. आपल्याला मुलगी झाल्याची आनंदाची बातमी मिळताच ते सुट्टी घेऊन घरी जाण्याची तयारी करीत होते. त्यांनी पत्नीला फोन करुन लवकरच लेकीला पाहायला येत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यातच शत्रूशी लढताना त्यांना वीरमरण आलं. हे वाचा-माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला, सुशांतच्या आठवणीत कृती सेनन झाली भावुक संपादन - मीनल गांगुर्डे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या