रीवा, 24 मार्च : आरोग्य ही व्यक्तीची सर्वात मोठी संपत्ती आहे, असं म्हटलं जातं. पण दुर्दैवाने काही जण आरोग्याच्या दृष्टीने कमकुवत असतात. काहींना विविध प्रकारच्या व्याधी असतात, आजार असतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील त्योंथर भागातील अंजोरा गावात राहणारे एका कुटुंबातील सदस्य एका वेदनादायक आजाराने त्रस्त आहेत. हा असा आजार आहे, ज्याचा उपचार जिल्ह्यातच नाही दिल्लीतील एम्समधील (AIIMS Delhi) डॉक्टरांकडेही होऊ शकत नाही. या कुटुंबातील सदस्यांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी सामान्य माणसांप्रमाणेच आहेत. पण तरी या कुटुंबातील सदस्यांचे शरीर कोरडे होत आहे. तसेच त्यांचे वजन दर महिन्याला कमी होत आहे. 65 वर्षीय राम नरेश यादव हे कुटुंबातील सर्वात मोठे आहेत. ते स्वतः या आजाराने त्रस्त आहेत. आता ते चालायलाही हतबल झाले आहेत. तसेच त्यांची 32 वर्षांची मुलगी सुशीला यादव , मुलगा अनीस वय 25, मनीष वय 23 आणि मनोज वय 20 हे सर्वजण अशक्त झाले आहेत. या कुटुंबाला अनेक ठिकाणी जाऊन उपचार केले. मात्र, रीवाहून जबलपूर, नागपूर आणि दिल्लीला जाऊनही या आजारातून त्यांची सुटका झाली नाही.
हा आजार नेमका आहे तरी काय? बऱ्याच संशोधनानंतर दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी हा आजार ‘मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ असे निदान केले आहे. रेवा येथील संजय गांधी स्मृती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.यत्नेश त्रिपाठी सांगतात की, हा आजार अनुवांशिक आहे. त्यांच्या मुलांनाही हाच आजार होण्याची शक्यता आहे. त्याची उपचारपद्धती फक्त आणि फक्त जीन थेरपी आहे. तसेच ही परदेशात केली जाते आणि ती खूप महाग आहे. एका मुलाच्या बापाचा तरुणीवर आला जीव, कारमध्ये दिसले या स्थितीत, घटनेनं खळबळ या आजाराने ग्रस्त यादव कुटुंबाचे म्हणणे आहे की, आता त्यांच्याकडे कोणताही मार्ग नाही. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकदा भेटायचे आहे आणि त्यांना त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत, असे या परिवाराने म्हटले आहे.