हैद्राबाद, 25 डिसेंबर : एका 19 वर्षांच्या दलित महिलेची (Dalit woman) तिच्या प्रियकराने (boyfriend) कथितरीत्या निर्दय हत्या केल्याची घटना आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) अनंतपूर जिल्ह्यात मंगळवारी घडली.
तली पीडिता, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धर्मावरम शाखेत काम करायची. ती सकाळी ऑफिसला जाण्यास निघाली मात्र संध्याकाळी परत आली नाही. तिच्या पालकांना तिचा फोन बंद लागला तेव्हा त्यांनी अनंतपूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिचा मृतदेह धर्मावरम तालुक्यातील बंदंन्नापल्ली इथं बुधवारी सकाळी आढळून आला.
स्नेहलताच्या पालकांनी राजेश आणि त्याचा मित्र कार्तिक हे दोघं गुन्ह्यात दोषी असल्याचं म्हटलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की राजेश पूर्वीपासूनच स्नेहलताला प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याबाबत आग्रह करून छळायचा. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रारही दिली आहे.
पोलिसांच्या मते, राजेशने स्नेहलताला पावणेसात वाजता बळजबरीनं आपल्या दुचाकीवर बसवत बंदंन्नापल्ली इथल्या शेतावर नेलं. तिचा गळा चिरत खून केला. तिची ओळख लपवण्यासाठी त्यानं तिच्याकडे असलेलं बँक पेपर्स तिच्याच शरीरावर ठेवत जाळले. परिणामी तिचा मृतदेह अर्धवट जळाला. लैंगिक गुन्ह्याचा कुठला पुरावा सापडला नसल्याचे पोलीस म्हणाले.
गुन्हा केल्यावर राजेश कथितरित्या घरी जात मित्र कार्तिकसोबत दारू पित बसला. पोलिसांनी केस दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.
तेलंगणामधील जगितियल जिल्ह्यात घडलेल्या अजून एका धक्कादायक प्रकरणात एका अनोळखी माणसानस महिलेवर अॅसिड हल्ला केला. ही घटना इब्राहिमपटणम तालुक्यातील थीम्मापुर तांडा इथं घडली. पोलिसांनी सांगितल्यानुसार थीम्मापुर तांडा इथल्या भुक्या स्वाती हिचा विवाह डब्बा गावच्या रवी याच्याशी पाच वर्षांपूर्वी झाला होता. रवीचं सहा महिन्यांपूर्वी निधन झालं. स्वाती नुकतीच थीम्मापुरला एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी गेली होती. घरी येताना हेल्मेट घातलेल्या तीन अनोळखी माणसांनी तिच्यावर ऍसिड टाकलं. तिचा चेहरा यात गंभीरपणे जळाला.
स्थानिकांनी धावपळ करत तिला मेटाप्पल्ली हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पीडितेच्या जबाबानुसार केस दाखल होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andhra pradesh, Crime, Dalit, Murder