• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • Dadra-Nagar Haveli bypolls: दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय, भाजपला मोठा झटका

Dadra-Nagar Haveli bypolls: दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय, भाजपला मोठा झटका

Dadra-Nagar Haveli bypolls: दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय, भाजपला मोठा झटका

Dadra-Nagar Haveli bypolls: दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय, भाजपला मोठा झटका

Dadra-Nagar Haveli lok sabha bypoll result : दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर 51 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल (Daddra Nagar Haveli Loks Sabha bypolls result) जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर (Shiv Sena Kalaben Delkar wins) यांनी तब्बल 51009 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कलाबेन देलकर यांना एकूण 1,12741 मते मिळाली तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित (BJP Mahesh Gavit) यांना 63,382 मते मिळाली. या निवडणूक निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. या विजयामुळे आता महाराष्ट्राचा खासदार विजयी झाला आहे. तसेच शिवसेनेने आता महाराष्ट्राच्या बाहेर आता वाटचाल सुरू केली असल्याचं दिसत आहे. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांची जागा रिक्त होती. या जागेवर झालेल्या निवडणुकीत डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला आहे. काही दिवसांपूर्वीच कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला होता. लोकसभेच्या दादरा आणि नगर हवेली, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि मध्यप्रदेशातील खांडवा या तीन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. 30 ऑक्टोबर रोजी मतदान झाले असून आज या सर्व ठिकाणची मतमोजणी होत आहे. यासोबतच आसाममधील पाच, पश्चिम बंगालमधील चार, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी तीन, बिहार, कर्नाटक, राजस्थानमधील प्रत्येकी दोन तर आंध्रप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोराम आणि तेलंगणातील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे. लोकसभेच्या दादरा आणि नगर हवेली, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि मध्यप्रदेशातील खांडवा या तीन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. 30 ऑक्टोबर रोजी मतदान झाले असून आज या सर्व ठिकाणची मतमोजणी होत आहे. यासोबतच आसाममधील पाच, पश्चिम बंगालमधील चार, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी तीन, बिहार, कर्नाटक, राजस्थानमधील प्रत्येकी दोन तर आंध्रप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोराम आणि तेलंगणातील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे. नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराची आघाडी नांदेड जिल्ह्यातील (Nanded district) देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी (Deglur Assembly election bypolls counting) होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 14 टेबलवर ही मोजणी 30 फेऱ्यांची होत आहे. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी आघाडी घेतल्याचं पहायला मिळत आहे. 21व्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर - 78923 मते सुभाष साबणे - 48657 मते उत्तम इंगोले - 8856 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 30266 मतांनी आघाडीवर 20व्या फेरीनंतर जितेश अंतापूरकर - 74821 मते सुभाष साबणे - 47058 मते उत्तम इंगोले - 8019 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 27763 मतांनी आघाडीवर 19वी फेरी जितेश अंतापूरकर - 70675 मते सुभाष साबणे - 45452 मते उत्तम इंगोले - 7668 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 25223 मतांनी आघाडीवर अठरावी फेरी जितेश अंतापूरकर - 66979 मते सुभाष साबणे - 43101 मते उत्तम इंगोले - 7372 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 23878 मतांनी आघाडीवर सतराव्या फेरी नंतर जितेश अंतापूरकर - 63537 मते सुभाष साबणे - 40835 मते उत्तम इंगोले - 6953 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 22702 मतांनी आघाडीवर सोळावी फेरी जितेश अंतापूरकर - 60116 मते सुभाष साबणे - 39034 मते उत्तम इंगोले - 6388 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 21082 मतांनी आघाडीवर पंधरावी फेरी जितेश अंतापूरकर - 56409 मते सुभाष साबणे - 37229 मते उत्तम इंगोले - 5794 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 19180 मतांनी आघाडीवर तेराव्या फेरी अखेरीस जितेश अंतापूरकर - 52599 मते सुभाष साबणे - 34857 मते उत्तम इंगोले - 5059 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 17742 मतांनी आघाडीवर बारावी फेरी जितेश अंतापूरकर - 44344 मते सुभाष साबणे - 30169 मते उत्तम इंगोले - 4464 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर अकरावी फेरी जितेश अंतापूरकर - 40523 मते सुभाष साबणे - 27943 मते उत्तम इंगोले - 4047 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 12580 मतांनी आघाडीवर दहाव्या फेरीनंतर जितेश अंतापूरकर - 36592 मते सुभाष साबणे - 25623 मते उत्तम इंगोले - 3560 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10969 मतांनी आघाडीवर नवव्या फेरीअखेरीस महावी - जितेश अंतापूरकर - 33068 भाजप- सुभाष साबणे - 22486 वंचित- उत्तम इंगोले - 3022 कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर 10582 मतांनी आघाडीवर आठव्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर - 29375 मते सुभाष साबणे - 19873 मते उत्तम इंगोले - 2668 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 9502 मतांनी आघाडीवर सातव्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर - 25376 मते सुभाष साबणे - 17164 मते उत्तम इंगोले - 2257 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 8212 मतांनी आघाडीवर सहाव्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर - 22332 मते सुभाष साबणे - 14564 मते उत्तम इंगोले - 1840 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 7768 मतांनी आघाडीवर पाचव्या फेरीअखेर जितेश अंतापूरकर - 18245 मते सुभाष साबणे - 12077 मते उत्तम इंगोले - 1505 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 6168 मतांनी आघाडीवर चौथ्या फेरीअखेर जितेश अंतापूरकर - 14544 सुभाष साबणे - 9975 उत्तम इंगोले - 1225 काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 4557 मतांनी आघाडीवर तिसरी फेरी तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना 10712 मते, तर भाजपच्या सुभाष साबणे यांना 7448 मते जितेश अंतापूरकर - 10712 मते सुभाष साबणे - 7448 मते उत्तम इंगोले - 873 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 3264 मतांनी आघाडी दुसरी फेरी काँग्रेसचे जितेश अंतापूरकर - 7295 मते भाजपचे सुभाष साबणे - 5001 मते वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले - 769 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 2293 मतांनी आघाडीवर पहिल्या फेरी अखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर - 4216 मते भाजपचे सुभाष साबणे - 2592 मते वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले - 320 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर - 1624 मतांनी आघाडीवर काँग्रेसचे नेते दिवंगत रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्य लढत जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) आणि सुभाष साबणे (Subhash Sabane) यांच्यात होत आहे. ही निवडणूक काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. तर भाजपाने देखील ही जागा जिंकण्यासाठी जोर लावला आहे. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं होतं. एकूण 2 लाख 98 हजार 535 मतदारांपैकी 1 लाख 90 हजार 800 इतकं मतदान झालं. एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढत झाली. वंचित आघाडीने देखील आपला उमेदवार दिला होता. वंचितला किती मत मिळतात यावर देखील जय पराभव अवलंबून आहे.
Published by:Sunil Desale
First published: