जाहिरात
मराठी बातम्या / देश / जंगल मे मंगल, पोलिसांनी छापा टाकला अन् उडाली एकच खळबळ, काय आहे प्रकरण

जंगल मे मंगल, पोलिसांनी छापा टाकला अन् उडाली एकच खळबळ, काय आहे प्रकरण

जंगल मे मंगल, पोलिसांनी छापा टाकला अन् उडाली एकच खळबळ, काय आहे प्रकरण

छत्तीसगडमध्ये सायबर सेल आणि महासमुंद जिल्हा पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून 7 जणांना अटक केली.

  • -MIN READ Local18 Chhattisgarh
  • Last Updated :

रामकुमार नायक (महासमुंद), 14 मे : छत्तीसगडमध्ये सायबर सेल आणि महासमुंद जिल्हा पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून 7 जणांना अटक केली. या छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 1 लाख 99 हजार 70 रुपयांची रोकड आणि दुचाकी जप्त केल्या आहेत. दरम्यान ही कारवाई महासमुंद तुमडबारी जंगलात कारवाई करण्यात आली. या लोकांना जुगार खेळत असताना पकडण्यात आले. दरम्यान, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर सेल आणि पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून सर्वांना पकडले.

जाहिरात

या प्रकरणी पोलीस अधीक्षक धर्मेंद्र सिंह यांनी सांगितले की, त्यांना महासमुंद तुमडबारी जंगलात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे त्यांनी तातडीने एक पथक तयार करून जुगार अड्ड्यावर छापा टाकला.  

नवजात मुलीला मांडीवर घेऊन अधिकारी पत्नीसह कार्यालयात पोहोचले, जाणून घ्या पुढे काय झाले…

दरम्यान, मनोजकुमार रात्रे, रामधर चंद्राकर, राहुल पांडे, छन्नू लाल साहू, ऋतिक चंद्राकर, समीर खान आणि करण रामटेके यांना महासमुंद पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे.

सिंह यांनी सांगितले की, घटनास्थळावरून सुमारे 1 लाख 99 हजार 70 रुपये किमतीची रोकड आणि तासच्या पानांसह दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अर्ध्या तासात परत येतो म्हणत घरातून निघाला पण परतलाच नाही, सत्य समोर येताच परिसर हादरला

ते म्हणाले की, महासमुंद तुमडबारी जंगलात एक-दोन दिवसांपासून जुगार खेळल्या जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यावर ही कारवाई करण्यात आली. सध्या सर्वांवर जुगार कायदा कलम 13 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात