भयंकर! ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच दुकानदाराची गोळी झाडून हत्या, मार्केटमध्ये थरार

भयंकर! ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच दुकानदाराची गोळी झाडून हत्या, मार्केटमध्ये थरार

हा गोळ्या झाडणारा माथेफिरू तेवढ्यावरच थांबला नाही त्याने त्याच दुकानापासून थोड्याच अंतरावर असेलल्या मेडिकल दुकानदारावरही गोळ्या झाडल्या. त्यात तो जखमी झाला.

  • Share this:

पानीपत 31 ऑक्टोबर: कोरोनाला रोखायचं असेल तर प्रत्यकाने मास्क घालावा असं सरकारने जाहीर केलं आहे. लस आल्याशीवाय मास्क हाच सर्वात चांगला उपाय असल्याचं मत तज्ज्ञांनीही व्यक्त केलंय. मात्र अनेक जण हा नियम धुडकावून लावत आहेत. हरियाणातल्या पानीपतमध्ये मास्क (Mask) का घातला नाही अशी दुकानदाराने विचारणा करताच ग्राहकाने थेट गोळ्याच घातल्याचा (Fire) धक्कादायक प्रकार घडला यात दुकानदाराचा मृत्यू झाला.

हा गोळ्या झाडणारा माथेफिरू तेवढ्यावरच थांबला नाही त्याने त्याच दुकानापासून थोड्याच अंतरावर असेलल्या मेडिकल दुकानदारावरही गोळ्या झाडल्या. त्यात तो जखमी झाला, मात्र थोडक्यात बचावला. नंतर मात्र लोकांनी त्याला पकडून त्याची यथेच्छ धुलाई केली.

त्यानंतर लोकांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्याच्याकडून देशी कट्टा आणि 12 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. हा आरोपी या दुकानांवर वारंवार मास्क न घालताच येत होता. त्याला मास्क घालून ये असं ते वारंवार सांगत होते. मात्र तो ऐकत नव्हता. त्याचा राग त्याला आला असावा. त्यामुळेच त्याने हा हल्ल्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोना विषाणू (CoronaVirus)मुळे संपूर्ण जगातली जीवनशैलीच बदलली. या भयंकर विषाणूपासून बचावासाठी काही सार्वजनिक प्रोटोकॉल जगभर पाळले जात आहेत. तोंडावर मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, वारंवार सॅनिटायझरनी हात धुणं हे प्रोटोकॉल अंगी बाणवायला सुरुवात करून आता वर्ष उलटत आलं. याच काळात जसं कोरोनाची लस शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे तसंच माणसांच्या वागण्यासंबंधीही वेगवेगळे अभ्यास व संशोधनं केली जात आहेत.

‘खुलासा केला तर काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही’

त्यापैकी एका अभ्यासात असं लक्षात आलं आहे की, सार्वजनिक वर्तनाचे जे कोविडसंबंधी प्रोटोकॉल आहेत ते काटेकोरपणे पाळले गेले तर बाहेर रेस्टॉरंटमध्ये खायला किंवा किराणा माल खरेदीला जाणं याच्या तुलनेत विमानानी प्रवास करणं कमी धोकादायक आहे. म्हणजे कोरोना विषाणू संसर्ग होण्याची शक्यता विमान प्रवासात कमी आहे.

तुम्हाला स्वाभाविक वाटेल की किराणा खरेदीला जाणं आणि विमान प्रवास यांची तुलना कशाला करायची. त्यामागेही एक महत्त्वाचं कारणं आहे ते म्हणजे, हा अभ्यास काही विमान वाहतूक कंपन्या, विमान उत्पादक कंपन्या आणि एअरपोर्ट चालवणाऱ्या कंपन्यांनी आर्थिक निधी देऊन करून घेतला आहे. सध्या कोरोनाच्या धास्तीमुळे विमान प्रवासाचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे विमान कंपन्यांना ग्राहक आकर्षित करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

‘देव जरी CM झाले तरी सर्वांना नोकरी देणं अशक्य’ या मुख्यमंत्र्यांनीच घेतली शाळा

हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने ‘Aviation Public Health Initiative’ हा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, कोव्हिडसंबंधी सर्व प्रोटोकॉलचं पालन केलं तर बाजारात सामान खरेदीला गेल्यामुळे कोरोना होण्याचा धोका अधिक असून, तुलनेने विमान प्रवासात कोरोना संक्रमण होण्याचा धोका कमी आहे. कोविड-19 चे प्रोटोकॉल आणि फेसमास्क वापरणं, हात धुणं इ. नॉन-फार्मास्युटिकल पद्धतींनी घेतली जाणारी काळजी ही भयानक कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी किती महत्त्वाची आहे. हे सिद्ध करणं हा हार्वर्डच्या या अभ्यासाचा मूळचा हेतू होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 31, 2020, 9:50 PM IST
Tags: Murder

ताज्या बातम्या