जाहिरात
मराठी बातम्या / देश / कुठे जमावबंदी तर कुठे दगडफेक अन् जाळपोळीच्या घटना; ईदच्या दिवशी देशभरात तणावाचं वातावरण

कुठे जमावबंदी तर कुठे दगडफेक अन् जाळपोळीच्या घटना; ईदच्या दिवशी देशभरात तणावाचं वातावरण

कुठे जमावबंदी तर कुठे दगडफेक अन् जाळपोळीच्या घटना; ईदच्या दिवशी देशभरात तणावाचं वातावरण

राजस्थानमधल्या जोधपूर (Jodhpur) भागात सोमवारी (2 मे 2022) रात्री झेंडे (Flags) आणि लाउडस्पीकर (Loudspeaker) लावण्यावरून दोन गटांदरम्यान दगडफेकीची (Stone throwing) घटना घडली. हा वाद मंगळवारी (3 मे 2022) अधिकच तीव्र झाला

    नवी दिल्ली 03 मे : देशाच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून धार्मिक, तसंच जाती-धर्माशी संबंधित गोष्टींवरून अशांतता निर्माण झाल्याचं दिसत आहे. यामुळे हिंसाचार, दगडफेक, जाळपोळ यांसारख्या घटना घडत आहेत. राजस्थानमधल्या जोधपूर (Jodhpur) भागात सोमवारी (2 मे 2022) रात्री झेंडे (Flags) आणि लाउडस्पीकर (Loudspeaker) लावण्यावरून दोन गटांदरम्यान दगडफेकीची (Stone throwing) घटना घडली. हा वाद मंगळवारी (3 मे 2022) अधिकच तीव्र झाला. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्येही (Anantnag) अशीच घटना घडली. एका मशिदीबाहेर जोरदार दगडफेक करण्यात आली. ईदच्या नमाजनंतर आंदोलकांनी सुरक्षा दलावरही दगडफेक केली. मध्य प्रदेशातल्या खरगोनमध्ये (Khargone) झालेल्या दंगलीला 22 दिवस उलटल्यानंतर कर्फ्यूमध्ये (Curfew) सण साजरे केले जात आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. `दैनिक भास्कर`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. BIG BREAKING: अखेर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, औरंगाबादमधील सिटी चौक पोलिसांत गुन्ह्याची नोंद जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी (3 मे) दगडफेकीच्या घटना घडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, ईदच्या नमाजनंतर एका मशिदीबाहेर दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी सुरक्षा दलावर दगडफेक केली. या भागातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मध्य प्रदेशातल्या खरगोनमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. या भागात दंगलीनंतर 22 दिवसांनी संचारबंदी कायम असताना सण साजरे केले जात आहेत. मंगळवारीदेखील संचारबंदी शिथिल न करण्याचा निर्णय पोलिस आणि प्रशासनाने घेतला आहे. ईदचा नमाज घरीच होणार आहे. अक्षय्य तृतीयेला शहरात कुठेही सार्वजनिक स्वरूपात विवाह होणार नाहीत. तसंच परशुराम जयंतीनिमित्त मिरवणूकही काढली जाणार नाही. दंगलीचा चटका सहन केलेल्या पोलिसांसाठी मंगळवारी पुन्हा परीक्षेचा दिवस होता. मंगळवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तर प्रशासन संचारबंदी हटवण्याबाबत निर्णय घेऊ शकतं, असं बोललं जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यातही तालाब चौक, पहाडसिंगपुरा, काजीपुरा, मोहन टॉकिज, गुरुव मोहल्ला, भावसार मोहल्ला या भागात विशेष नजर ठेवली जात आहे. `पोलिस पूर्णपणे अलर्ट (Alert) आहेत. संपूर्ण शहरात 1300 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातूनदेखील सतत नजर ठेवली जात आहे. रुग्णवाहिका, अग्निशामक दलासह विविध आपत्कालीन सेवांना अलर्ट देण्यात आला आहे. पोलिस मुख्यालयानं निमाड, मालवा आणि महाकौशल या संवेदनशील जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. पूर्वतयारी करण्यात आली असल्याने संवेदनशील भागात कोणतीही चूक होण्याची शक्यता नाही,` अशी माहिती प्रभारी एसपी रोहित काशवानी यांनी दिली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक; राज ठाकरेंवर संध्याकाळपर्यंत कारवाई ? राजस्थानमधल्या जोधपूर भागात सोमवारी (2 मे) रात्री झेंडे आणि लाउडस्पीकर लावण्यावरून दोन गटांमध्ये दगडफेक झाली. मंगळवारी (3 मे) हा वाद अधिक चिघळला. जोधपूरमधल्या जालोरी गेट भागात मंगळवारी सकाळी एका गटातल्या लोकांनी एकत्र येऊन पुन्हा अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला. या परिसरात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांवर लाठीमार केला. तसंच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून लोकांना पांगवलं. यावेळी हल्लेखोरांनी 20 पेक्षा अधिक गाड्यांच्या काचा फोडल्या. तसंच एटीएममध्येदेखील तोडफोड केली. या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. सोमवारी रात्री दोन गटांमध्ये दोन वेळा हिंसा झाली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री अशोक गहलोत (Chief Minister Ashok Gehlot) यांनी राज्याचे डीजीपी आणि अन्य अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. `या भागात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सोमवारी रात्रीपासून जालोरी गेट आणि ईदगाह भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या भागातली इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं असून, पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,` अशी माहिती जोधपूरचे पोलिस कमिशनर नवज्योती गोगोई यांनी दिली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात