नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या कृषी मेळाव्यात एक बोकड सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. खगरिया इथून राजस्थानमधल्या सिरोही जातीचा हा बोकड या मेळाव्यात आणण्यात आला होता. सबौरच्या बिहार कृषी विद्यापीठात क्षेत्रीय कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या जत्रेत सिरोही जातीचा बोकड पाहण्यासाठी गर्दी होत आहे. हा बोकड इथे आणल्यावर त्याची उंची आणि त्याची किंमत ऐकून सर्व जण त्याला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. दरम्यान, या बोकडाच्या मालकाने न्यूज 18 लोकलला त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगितलं.
हेही वाचा - सोबत जगले अन् सोबतच सोडलं जग, पतीच्या निधनानंतर अर्ध्या तासातच पत्नीनेही सोडले प्राण
खगरियाच्या अलौली भागामधून सागर नावाच्या शेतकऱ्याने आणलेला शेरा नावाचा हा बोकड उपस्थितांचं लक्ष वेधून घेत आहे. 'शेरा'ला पाहणारे त्याची उंची, किंमत आणि जात पाहून त्याचं कौतुक करताना थकत नाहीयेत. मालक सागर यांनी सांगितलं, की शेरा हा सिरोही जातीचा बोकड असून त्याचं वय 2 वर्षं आहे. सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बोकड फक्त फळं, गवत आणि कच्च्या भाज्या खातो. या बोकडाची किंमत 50,000 रुपये ठरवली गेली आहे.
या बोकडाची वैशिष्ट्यं
सागरने सांगितलं की, या बोकडाची लांबी 3 फुटांपेक्षा जास्त आहे. राजस्थानमधल्या सिरोही जिल्ह्यात या जातीचे बोकड मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांचं शरीर मध्यम आकाराचं असतं व रंग तपकिरी असतो. त्यांच्या शरीरावर फिकट तपकिरी किंवा पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. कानांचा आकार पानासारखा असतो आणि ते लटकलेले असतात. त्यांचा आकार सुमारे 10 सेंटिमीटरपर्यंत असतो.
सध्या आपण हा बोकड विकण्याच्या विचारात नाही, असं सागर यांनी सांगितलं; पण चांगले पैसे मिळाल्यास विकण्याचा करता येईल, असंही ते म्हणाले. या बोकडाला पाहण्यासाठी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी चांगलीच गर्दी केली होती.
एकंदरीतच या बोकडाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. परिसरात अशा प्रकाराचे बोकड आढळत नसल्याने त्याला पाहण्यासाठी खूप गर्दी होत आहे. इतर सामान्य बोकडांच्या तुलनेत याची किंमतही खूप आहे. त्यामुळे त्याचं दिसणं आणि किंमत हे दोन्हीही सध्या तिथल्या शेतकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. शिवाय हा बोकड कमी किमतीत विकण्याचा आपला विचार नाही, असंही त्याच्या मालकाने स्पष्ट केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.