जालान (उत्तर प्रदेश), 10 मे : लग्नाच्या वरातीमधून पहाटे घरी परतलेल्या पतीने दरवाजा उघडण्यास वेळ केल्याच्या कारणास्तव पत्नीचा खून (Wife Murder) केल्याची धक्कादायक घटना येथे समोर आली आहे. अर्धा तास झाला तरी दरवाजा उघडला नाही म्हणून रागाच्या भरात हे कृत्य केले. त्यानंतर बराच वेळ पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिल्यानंतर सोमवारी सकाळी पोलीस ठाणे (Police Station) गाठून पतीने घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत ही हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार रामपुरा पोलीस ठाणे परिसरात सुभाष नगर वॉर्ड नंबर 2 येथे घडला आहे. पती शिवराज पाल याचे त्याची पत्नी गीता (वय 35) हिच्याशी अलीकडे वारंवार वाद होत होता. शिवराज रविवारी रात्री एका विवाह सोहळ्यासाठी गेला होता. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास तो घरी परतला आणि दार ठोठावले. पण, पत्नी गीताने सुमारे अर्ध्या तासाने दरवाजा उघडला. त्यावरून पती शिवराजने पत्नीवर संशय घेतला आणि दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला.
हे वाचा - झुंज अयपशी, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांचं कोरोनामुळे निधन
असा झाला खून
दोघांमधील वाद इतका वाढला की शिवराजने धारदार शस्त्रानं आपल्या पत्नीवर हल्ला करून तिची हत्या केली. आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे लक्षात आल्यावर शिवराज बराच काळ मृतदेहाजवळ बसून राहिला आणि सकाळी त्यानं पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. घटनेची माहिती कळताच रामपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी जेपी पाल यांनी त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले. तसेच पथकांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह पडल्याचे आढळले.
हे वाचा - नमाज पठणावरून मुस्लीम गटांत तुंबळ हाणामारी; लोखंडी रॉड अन् हॉकी स्टीकनं फोडली एकमेकांची डोकी
प्रभारी निरीक्षक जे.पी.पाल यांचे म्हणणे आहे की, घरगुती कारणांवरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. आरोपी वारंवार आपल्या पत्नीवर अवैध संबंध असल्याचा संशय व्यक्त करत होता. सोमवारी पहाटेही असाच प्रकार घडला, हा बाहेरून आल्यानंतर दरवाजा लवकर उघडला नाही म्हणून चारित्र्यावर संशय घेत त्याने धारदार शस्त्राने हल्ला करून पत्नीचा खून केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Uttar pradesh news