गुजरातच्या पावागड मंदिरात एका दिवसात सुमारे एक लाख भाविक जमले होते. राज्यातील पंचमहाल जिल्ह्यातील महाकाली मंदिरात रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
एकीकडे पंतप्रधान मोदी पर्यटकांच्या गर्दीवर चिंता व्यक्त करत तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, असं आवाहन करत आहेत, पण भाविक, भक्त आणि पर्यटक त्यांचंही ऐकायला तयार नाहीत.
सापुतारा या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली. गुजरातच्या डांग जिल्ह्यातील या हिल स्टेशनला मान्सून पर्यटनासाठी गर्दी वाढते आहे.
दुसर्या लाटेदरम्यान गुजरातमध्ये कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाला होता. बळींची संख्याही मोठी होती. पर्यटकांची अशी गर्दी पाहून कोरोनाची तिसरी लाट अजून मोठ्या प्रमाणात येण्याची भीती निर्माण होत आहे.