Home /News /mumbai /

COVID-19 धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी संख्या, 24 तासांमध्ये वाढले तब्बल 5318 रुग्ण

COVID-19 धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी संख्या, 24 तासांमध्ये वाढले तब्बल 5318 रुग्ण

मुंबईत अंधेरी पूर्व (Andheri east) हा भाग कोरोनाचा HOT SPOT झाला असून या भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 5000चा आकडा पार केला आहे.

    मुंबई 26 जून: अनलॉक (Unlock) नंतर कोरोना रुग्णांच्या (Corona) संख्येत होत असलेली वाढ अजुनही सुरूच आहे. आज तर आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असून 24 तासांमध्ये तब्बल 5318 COVID- 19  रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 59 हजार 133वर गेला आहे. सगल दुसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज 167 जणांचा मृत्यची नोंद झाली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 7273 वर गेला आहे. आज 167 मृत्यूंची नोंद झाली त्या पैकी 86 हे 48 तासातील तर 81 मृत्यू 2 दिवसांआधीचे आहेत. आज 4430 जणांना डिस्चार्ज, आतापर्यंत 84 हजार 245 डिस्चार्ज देण्यात आलाय. तर राज्यात 67 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णाच्या (Corona Patient) संख्येने मुंबईत (Mumbai) कहर केला आहे. राज्यात सर्वात जास्त बाधितांची संख्या ही मुंबईतच आहे. सुरुवातीला धारावीने हादरवून सोडलं होतं. आता मात्र धारावी नाही तर अंधेरी पूर्व (Andheri east) हा भाग कोरोनाचा HOT SPOT झाला असून या भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 5000चा आकडा पार केला आहे. अंधेरी पूर्व हा मुंबईतील पहिला प्रभाग आहे ज्यात 5 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. तर एस प्रभाग म्हणजेच भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग पवई या भागात 4000पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहे. मुंबईत 5 वॉर्डात तब्बल 4 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. आता पावसाळा लागल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. मुंबईत ‘हा’ भाग बनला सर्वात मोठा कोरोना HOT SPOT, रुग्णसंख्या वाचून बसेल धक्का कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) करोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्येही काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन (Dexamethasone) औषध वापरायला परवानगी दिली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हे औषध वापरलं जाणार आहे. पुण्यातून आली मोठी बातमी! सलून चालकांसाठी आयुक्तांनी काढला महत्त्वाचा आदेश ब्रिटनमध्ये केलेल्या संशोधनात डेक्सामेथासोन औषध करोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, अ‍ॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे औषध करोनावर सुद्धा प्रभावी ठरत आहे. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. कोरोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे असा सल्लाही WHO ने दिला होता. संपादन - अजय कौटिकवार  
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या