मराठी बातम्या /बातम्या /देश /देशात कोरोना रुग्णसंख्येने वाढवली चिंता, केंद्राने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

देशात कोरोना रुग्णसंख्येने वाढवली चिंता, केंद्राने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ

कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ

पाच दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. बॅक्टेरिअल इन्फेक्शनची शंका असेल तर अँटिबायोटिक वापरू नका असा सल्लाही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 मार्च : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, पाच दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. बॅक्टेरिअल इन्फेक्शनची शंका असेल तर अँटिबायोटिक वापरू नका.

गेल्या २४ तासात भारतात हजारहून जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. नागरिकांनी कोरोनासह इतर विषाणूजन्य संसर्ग झाला आहे का याची नोंद घ्यावी असं केंद्राने म्हटलंय. सौम्य आजारावर सिस्टिमिक आणि कॉर्टिकोस्टिरॉइड्स घेणं टाळा. मास्कचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा अशी सूचना केंद्राने दिलीय. याशिवाय शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन लेवल यावर लक्ष ठेवण्यासही सांगितले आहे.

उन्हाळ्यात दही खाताना 'या' चुका टाळा, नाहीतर पडेल महागात

श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, ताप आणि खोकला ५ दिवसांहून अधिक काळ राहिला तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास केंद्रीय आऱोग्य मंत्रालयाने दिला आहे. गंभीर लक्षणे किंवा अधिक ताप असलेल्या रुग्णांना पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषध देता येईल. मात्र ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं असं नागरिकांना आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय.

कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली आला होता. पण आता नव्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढायला लागली आहे. जवळपास चार महिन्यांनी भारतात एका दिवसात एक हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झालीय. गेल्या २४ तासात देशात १०७१ नवे कोरोना रुग्ण आढळले असून सध्या सक्रीय रुग्णांची संख्या जवळपास ६ हजार इतकी आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Vaccinated for covid 19