मराठी बातम्या /बातम्या /देश /लाचखोर लेखापालानं कमावली करोडोंची माया; कोर्टानं घडवली अद्दल, ठोठावलेला दंड वाचून व्हाल हैराण

लाचखोर लेखापालानं कमावली करोडोंची माया; कोर्टानं घडवली अद्दल, ठोठावलेला दंड वाचून व्हाल हैराण

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime News: बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी न्यायालयानं लाचखोर लेखापालाला 4 वर्षांचा कारावास (4 years imprisonment) आणि 1 कोटी 80 लाख रुपयांचा दंड (fined Rs 1 crore 80 lakh) ठोठावला आहे.

उज्जैन, 01 डिसेंबर: बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लेखापालाला न्यायालयाने आयुष्यभराची अद्दल घडवली आहे. न्यायालयानं लाचखोर लेखापालाला 4 वर्षांचा कारावास (court sentenced 4 years imprisonment) आणि 1 कोटी 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला (fined Rs 1 crore 80 lakh) आहे. उज्जैनच्या कोणत्याही लेखापालावर केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. इंदूरचे विशेष न्यायाधीश यतींद्र कुमार गुरू यांनी मंगळवारी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला आहे.

ओमप्रकाश विश्वप्रेमी असं शिक्षा झालेल्या लेखापालाचं नाव असून तो मध्य प्रदेशातील उज्जैन शहराच्या बागपुरा येथील रहिवासी आहे. याप्रकरणी न्यायालायने आरोपीला 4 वर्षे सश्रम कारावासासह 1 कोटी 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. लेखापाल पदावरील व्यक्तीला एवढा मोठा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे. न्यायालयात फिर्यादी पक्षाची बाजू इंदूर येथील विशेष सरकारी वकील महेंद्रकुमार चतुर्वेदी यांनी मांडली आहे.

हेही वाचा-लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीकडे प्रेम व्यक्त करणं हा लैंगिक छळ? कोर्टाचा निकाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैन जिल्ह्याच्या लालपूर तहसील कार्यालयातील लेखापाल ओमप्रकाश विश्वप्रेमी याने बेहिशोबी मालमत्ता मिळवली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 15 सप्टेंबर 2011 रोजी आरोपी लेखापाल ओमप्रकाश विश्वप्रेमी याच्या बागपुरा येथी निवासस्थानाची झडती घेतली होती. यावेळी आरोपी, त्याची पत्नी, आई आणि नोकर यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. तसेच सोन्या-चांदीचे दागिने, चारचाकी आणि दुचाकी वाहनं आणि इतर चैनीच्या वस्तू देखील आरोपीच्या घरात सापडल्या होत्या.

हेही वाचा-कोणताही गुन्हा न करता तब्बल 4 दशकं तुरुंगात राहिला; 43 वर्षांनी निर्दोष सुटका

नोकर, आई आणि पत्नीच्या नावावर लाखोंची संपत्ती

लेखापालाच्या नोकराच्या बँक खात्यात 1047616 रुपये आणि 8554860 रुपयांचे व्यवहार झाल्याचं आढळून आलं आहे. तर आरोपीच्या पत्नीच्या दोन खात्यांमध्ये 838345 रुपये आणि 840475 रुपये आढळले होते. याशिवाय आरोपीच्या आईच्या तीन खात्यात 250000 रुपये, 16707 रुपये आणि 102500 रुपये जमा असल्याचं आढळून आलं.

First published:
top videos

    Tags: Madhya pradesh