रामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर, वाचा कारण

रामदेव बाबा अन् अ‍ॅलोपॅथी वादाला नवं वळण; न्यायालयानं IMA ला मागितलं उत्तर, वाचा कारण

बाबा रामदेव (Ramdev Baba) यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केली होती. यावरुन गेले अनेक दिवस वाद सुरू आहे, अशात आता न्यायालयानं इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), त्याचे अध्यक्ष, सचिव आणि आणखी एका व्यक्तीला उत्तर मागितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 20 जून : बाबा रामदेव (Ramdev Baba) यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केली होती. यावरुन गेले अनेक दिवस वाद सुरू आहे, अशात आता दिल्लीच्या एका न्यायालयानं शनिवारी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), त्याचे अध्यक्ष, सचिव आणि आणखी एका व्यक्तीला उत्तर मागितलं आहे. आयुर्वेदीक उपाचर आणि औषधांसंदर्भात अपमानजनक विधान केल्यानं सार्वजनिकरित्या माफी मागण्यासही यावेळी सांगितलं गेलं आहे. राजेंद्र सिंह राजपूत यांच्याकडून दाखल याचिकेवर सुनावणी करत न्यायालयानं IMA, अध्यक्ष डॉ. जे ए जयलाल. सचिव डॉ. जयेश लेले आणि नॅशनल मेडिकल कमिशन यांना नोटीस पाठवली आहे.

अपहरण करुन पळवून नेत होते गुंड; 230 KM पाठलाग करुन मित्राच्या बहिणीला वाचवलं

न्यायालयानं 9 जुलैपर्यंत या सर्वांना उत्तर मागितलं आहे. वकील भरत मल्होत्रा यांनी न्यायालयात मागणी केली आहे, की जयलाल, लेले आणि आयएमए यांना आयुर्वेदीक उपचाप पद्धतीविषयी कोणतंही अपमानजनक विधान करण्यासाठी रोखलं जावं. आयुर्वेदावर विश्वास ठेवणार्‍या लोकांच्या भावना दुखावू नयेत, अशी विनंती याचिकेत केली गेली आहे. कोरोना लसीकरण (Corona Vaccine) आणि अॅलोपॅथी औषधांच्या प्रभावासंदर्भात बाबा रामदेव यांनी काही विधानं केली होती. याच कारणावरुन रामदेव बाबा आणि IMA प्रमुखांमध्ये वाद सुरू असतानाच न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत.

Covid-19: सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय?

आयएमए अध्यक्ष आणि सचिवांना कोणत्याही धर्माचा प्रचार करण्यापासून आणि हिंदुंच्या किंवा इतरांच्या भावना दुखावण्यासाठी आयएमएचा वापर करण्यापासून रोखावं, असं याचिककर्त्यानं म्हटलं आहे. आयएमएच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एखाद्या धर्माचा प्रचार आणि आयुर्वेदीक औषधांसंदर्भात चुकीचं विधान करण्यासाठी सार्वजनिक लिखित माफी मागण्यास म्हटलं गेलं आहे.

Published by: Kiran Pharate
First published: June 20, 2021, 7:14 AM IST

ताज्या बातम्या