Explainer: 'झिंक'च्या जास्त सेवनामुळं ब्लॅक फंगस वाढतोय का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Explainer: 'झिंक'च्या जास्त सेवनामुळं ब्लॅक फंगस वाढतोय का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

झिंकच्या (zinc tablets) अतिवापरामुळंही ब्लॅक फंगसचा धोका वाढला असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना रुग्णांना झिंकची मात्रा जास्त देण्यात आल्यामुळं काहींना ब्लॅक फंगस आणि इतर आजारांचा सामना करावा लागत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 मे : सध्या कोरोना विषाणूमुळे देशात भीतीचं वातावरण आहे. त्यातच आता वेगवेगळे बुरशीजन्य आजार (Fungal Infection) होत असल्यानं चिंता आणखी वाढली आहे. प्रतिकारशक्ती कमी असणं, स्टेरॉईड आणि ऑक्सिजनचा जास्त वापर असे काही कोरोनावरील उपचार यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं आहे. दरम्यान आता यात आणखी कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे आणि ते म्हणजे झिंक टॅबलेट (Zinc Tablets).

गेल्या वर्षी कोरोना काळामध्ये झिंकच्या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला होता. या गोळ्यांची भारतातील मागणी 93 टक्क्यांपर्यंत वाढली होती. झिंकच्या 54 कोटी गोळ्यांची विक्री झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा या गोळ्यांना मागणी वाढली होती. कोरोना बचावासाठी लोक सी विटामिनसोबत झिंकच्या गोळ्यांचाही मोठ्या प्रमाणात उपयोग करत होते. विशेष म्हणजे डॉक्टरही या गोळ्या घेण्यासाठी लिहून देत होते. झिंकच्या अतिवापरामुळेही ब्लॅक फंगसचा (Black Fungus) धोका वाढला असल्याचं काही तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजीव जयदेवन यांनी याबाबत एक ट्वीट केलं. ते म्हणाले, "कोरोना रुग्णांना झिंकची मात्रा जास्त देण्यात आल्यामुळे काहींना ब्लॅक फंगस आणि इतर आजारांचा सामना करावा लागत आहे. झिंकचं (Role of Zinc supplements in black fungus outbreak) शरीरातील प्रमाण जास्त वाढल्याने बुरशीजन्य आजार होण्यास अनुकूल वातावरण तयार होतं"

तर नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फोर्मेशन या अमेरिकेतील संशोधन संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, झिंकचा जास्त वापर केल्यास फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. झिंकमुळे 6 प्रकारचे बुरशीजन्य आजार होऊ शकतात. त्यामध्ये ब्लॅक फंगसचाही समावेश आहे, असे निष्कर्ष त्यांनी काढले होते.

जन्मानंतर कोरोनाने जन्मदातीला हिरावलं; मिनिटभरात दूध देण्यासाठी धावल्या शेकडो आई

झिंकचे फायदे-तोटे

झिंक धातू नेहमीच रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा मानला जातो. काहीवेळा डॉक्टर विशिष्ट रोगांमध्ये ते खाण्याची शिफारस करतात. यामुळे संसर्ग आणि श्वसन रोगाचा धोका कमी होतो. झिंकदमा आणि उच्च रक्तदाबातदेखील मदत करतं. याशिवाय पोट खराब झाल्यास झिंकचं औषध दिलं जातं. यामुळे अतिसारापासून बचाव होतो. मात्र काहीही असलं तरी डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच या गोळ्या घेतल्या पाहिजेत.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही लोक जास्त प्रमाणात झिंकच्या गोळ्यांचा वापर करतात. यामुळे पोट खराब होणं, ताप, थकवा यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. मूत्रपिंडही त्यातून कमकुवत होऊ लागतात. मधुमेहाच्या रुग्णांनीही जर झिंक जास्त प्रमाणात घेतलं तर रक्तातील साखर वाढते. हे धोकादायक असू शकतं. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनीदेखील डॉक्टरांच्या सूचनेनुसार झिंक घ्यावं, अन्यथा गंभीर समस्या उद्भवू शकतात.

ना इंजेक्शनची भीती, ना कडू गोळ्यांचं टेन्शन; फक्त हुंगून घेता येईल हे कोरोना औषध

प्रत्येक व्यक्तीची झिंकची गरज वेगवेगळी

लहान मुलांना कमी प्रमाणात झिंकची मात्रा दिली जाते. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांना याची जास्त आवश्यकता असते. बाहेरून गोळ्यांमधून देण्यात येण्याव्यतिरिक्त झिंक आपल्या खाण्यातून नैसर्गिकरित्या देखील मिळत असतं. शेंगदाणे झिंकचा उत्तम स्रोत आहेत. पांढरे छोले, टरबूजाच्या बिया, दही आणि डाळिंबामध्ये झिंक असतं.

Published by: News18 Desk
First published: May 29, 2021, 8:36 AM IST

ताज्या बातम्या