चंदिगढ, 28 मार्च : जगात कोरोनामुळे अनेक देश लॉकडाउन झाले आहेत. काही देशांमध्ये तर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. चीननंतर कोरोनाच्या विळख्यात अडकलेला देश म्हणजे इटली. सर्वाधिक मृतांची संख्या इटलीत आहे. अजुनही इटलीमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. दरम्यान, आता भारताच्या हरियाणात एका साध्वीचा मृत्यू झाला असून ती मूळची इटलीची होती. करनाल इथं सिक पाथरी माता मंदिरात क्लॉडिया काकालरो गेल्या अनेक वर्षांपासून राहत होती. इटलीत कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यामध्ये काकालरो हिच्या शेजारी राहणाऱ्या 10 जणांचा समावेश आहे. याची माहिती काकालरोला मिळताच तिला धक्का बसला आणि यातच तिचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी काकालरोचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्पना चावला मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला आहे. काकलरोच्या पतीचा 7 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतात आलेल्या काकालरोनं पाथरी माता मंदिरातील मछंदर गिरी यांच्याशी 2017 मध्ये लग्न केलं होतं. एक वर्षानंतर मछंदर यांचाही मृत्यू झाला.
काकालरोची तीन मुलं इटलीत असल्याची माहिती मिळते. कोरोनामुळे जवळच्या लोकांचे प्राण गेल्याचा धसका काकालरोनं घेतला असण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीनंतर व्यक्त केली. अद्याप शवविच्छेदनाचा आला नसून त्यानंतरच याबाबत समजू शकेल.
हे वाचा : कल्याण-डोंबिवली आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण, लग्न सोहळ्यात एकाला झाली लागण
इटलीची एकूण लोकसंख्या सहा कोटी इतकी आहे. या देशाला कोरोनाचा मोठा दणका बसला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे इटलीत 9 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 86 हजारांपेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण कमी झाले असले तरी मृतांची संख्या मात्र झपाट्यानं वाढली आहे.
हे वाचा :
‘कोरोना’चा धोका असताना गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी 10 हजार किमीचा प्रवास मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.