नवी दिल्ली, 08 एप्रिल : एखाद्या वस्तूमार्फत कोरोनाव्हायरस (coronavirus) पसरू शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून फळं-भाज्याही धुवून घ्याव्यात असा सल्ला दिला जातो आहे. अशात बेकरीतील पदार्थ (bakery items) खाऊ नये, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे. अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावरील या मेसेजमध्ये म्हटल्यानुसार, "बेकरीतील पदार्थ धुवून घेता येत नाहीत आणि त्यामुळे कोरोनाव्हायरसची लागण होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ खाणं टाळा"
Viral post
https://twitter.com/ullah_sherwani/status/1243449214350307333?s=08
मात्र खरंच असे पदार्थ खाल्ल्याने कोरोनाव्हायरसचा धोका आहे का? जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये किती तथ्य आहे. याचं fact check न्यूज 18 लोकमतने केलं.
या मेसेजमध्ये काहीही तथ्य नाही. WHO ने असा कोणताही सल्ला दिलेले नाही, असं WHO shri lanka ने म्हटलं आहे.
FACT CHECK : @WHO has not advised against eating bakery items
For credible information : https://t.co/r8hGvxOQKo pic.twitter.com/wnMmma9onH
— WHO Sri Lanka (@WHOSriLanka) March 28, 2020
कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अशा अफवांनाही अनेक जण बळी पडत आहेत. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
हात धुणं, मास्क वापरणं, शिंकताना-खोकताना नाक, तोंड झाकलं जाईल याची काळजी घ्या. हेच कोरोनाव्हायरसपासून वाचण्याचे मार्ग आहेत.