जाहिरात
मराठी बातम्या / देश / सावधान ! नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’; कॅश नव्हे डिजिटल पेमेंट करा, RBI चा सल्ला

सावधान ! नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’; कॅश नव्हे डिजिटल पेमेंट करा, RBI चा सल्ला

सावधान ! नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’; कॅश नव्हे डिजिटल पेमेंट करा, RBI चा सल्ला

आपण वापरत असलेल्या नोटा म्हणजे पेपर मनीवर (Paper money) हा जीवघेणा व्हायरस असू शकतो आणि या नोटांमार्फत हा व्हायरस पसरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 मार्च : आपल्याला कोरोनाव्हायरस (Coronavirus) होऊ नये, यासाठी तुम्ही पुरेपूर काळजी घेत आहात. मात्र तरीही तुम्हाला कोरोनाव्हायरसचा धोका आहे. तुम्ही वापरत असलेल्या नोटांवरही (Paper money) कोरोनाव्हायरस असू शकतो. आपण वापरत असलेल्या नोटा म्हणजे पेपर मनीवर (Paper money) हा जीवघेणा व्हायरस असू शकतो आणि या नोटांमार्फत तो पसरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे. त्यामुळे कॅश नव्हे, तर डिजिटल पेमेंट (digital payment) करा, असा सल्ला रिझर्व्ह बँकेने (RBI) दिला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बँकांनी जास्तीत जास्त डिजिटल पेमेंटवर भर द्यावा, असा सल्ला दिला आहे.

जाहिरात

या पत्रकार परिषदेत शक्तिकांत दास म्हणाले, “कोरोनाव्हायरस जास्त पसरू नये, यासाठी सरकार आणि आरोग्य विभाग प्रयत्न करतं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, जास्त कुणाशी संपर्क ठेवू नये, अशा सूचना सरकारने दिल्यात. अशावेळी बँकांनाही डिजिटल पेमेंटवर भर द्यावा. जेणेकरून ग्राहक बँकेत जास्त येणार नाही आणि त्यांचा कुणाशी जास्त संपर्क होणार नाही. डिजिटल पेमेंटमुळे ग्राहकांचा गर्दीशी संपर्क येणार नाही” हे वाचा -  तुम्हीही होऊ शकता Coronavirus चे शिकार, असा करा स्वत:चा बचाव दरम्यान भारतात कॉन्टॅक्टलेस ट्रान्झक्शेनवर भर द्यावा, अशी सूचना याआधी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) केंद्र सरकारकडे केली होती. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनी (CAIT) केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं होतं. कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाचा धोका पाहता करन्सी नोट्सऐवजी कॉन्टॅक्टलेस ट्रान्झेक्शन, डिजीटल ट्रान्झेक्शन वाढवण्यावर जोर देण्याचं आवाहन केलं. शिवाय प्लास्टिक नोट्सबाबतही विचार करण्यास सांगितलं आहे. CAIT ने अर्थमंत्रालयाला पत्र लिहिलं आहे आणि त्यामध्ये कोरोनाव्हायरसबाबतचे स्टडीज आणि मीडिया रिपोर्टचा हवाला दिला आहे. नोटा म्हणजे पेपर मनीवर (Paper money) हा जीवघेणा व्हायरस असू शकतो आणि या नोटांमार्फत हा व्हायरस पसरू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं होतं. करन्सी नोट्सवर मायक्रो-ऑर्गेनिज्म असतात, ज्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतो. नोटांमार्फत कित्येक प्रकारचे संसर्ग पसरतात, याबाबत तज्ज्ञांनीही सावध केलं आहे. यामुळे युरिनरी, श्वसनाच्या समस्या, स्किन इन्फेक्शन यासारखे आजार पसरण्याचा धोका वाढतो. यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या देशांनी पॉलिमर नोटांचा वापर सुरू केला आहे, जेणेकरून व्हायरसचं संक्रमण जास्त होणार नाही. भारतानंही अशाच पॉलिमर नोटांसारखा पर्याय शोधावा, असंही CAIT ने केंद्र सरकारला सुचवलं होतं. हे वाचा -  ‘आयसोलेशन वॉर्ड की लक्झरी हॉटेल’, रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णाचे डोळेच चमकले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात