सलाम कर्तव्याला! लग्नासाठी घेतलेली सुट्टी रद्द करून ड्युटीवर हजर झाली शाहिदा

सलाम कर्तव्याला! लग्नासाठी घेतलेली सुट्टी रद्द करून ड्युटीवर हजर झाली शाहिदा

एका महिला पोलिस अधिकाऱ्याने लग्नासाठी घेतलेली सुट्टी रद्द करून कामावर रुजू झाली आहे.

  • Share this:

ऋषिकेश, 05 एप्रिल : देशात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. लॉकडाउनच्या काळात डॉक्टर आणि पोलीस त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. एका महिला पोलिस अधिकाऱ्याने मात्र लग्नासाठी घेतलेली सुट्टी रद्द करून कामावर रुजू झाली आहे. शाहीदा परवीन या ऋषिकेशमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी लग्नासाठी सुट्टी घेतली होती पण ती रद्द करून ड्युटीवर हजर झाली.

लॉकडाउन नसतं तर शाहिदा आज नवरी झाली असती. मात्र त्याऐवजी तोंडाला मास्क लावून हातात काठी घेऊन कर्तव्य बजावताना ती दिसत आहे. लॉकडाउनच्या काळात  5 एप्रिलला होणारं लग्न तिने रद्द केलं. शाहिदाच्या या निर्णयाला तिच्या होणाऱ्या नवऱ्यानंसुद्धा होकार दर्शवला.

डेहराडूनची असलेली शाहिदा परवीन ही 2016 च्या बॅचमध्ये भरती झाली होती. सध्या ती मुनिकीरेती ठाण्यात कार्यरत आहे. तिचा विवाह लक्सर जिल्ह्यातील शाहिद शाह याच्याशी होणार होता. दोन्ही कुटुंबांनी लग्नाची पूर्ण तयारी केली होती. इतकंच काय शाहिदाने 50 दिवसांची सुट्टीही घेतली होती. दरम्यान लॉकडाउनची घोषणा करण्यात आली.

हे वाचा : बाधित झालेल्या नर्सने केली कोरोनावर मात, आता पुन्हा त्याच वॉर्डमध्ये जायचं आहे

लॉकडाउन झाल्यानंतर शाहिदाने लग्नाचा निर्णय पुढे ढकलला. याचा माहिती तिने मुलाकडच्या कुटुंबाला दिली. शेवटी दोघांनी मिळून लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. शाहिदा म्हणाली की, जर पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही तर त्यांचा वेगळा अर्थ लोकांमध्ये जाईल. मी जेव्हापासून खाकी वर्दी घातलीय तेव्हापासून लोकांच्या समस्या आणि कर्तव्याला प्राधान्य दिलं आहे.

हे वाचा : पोलिसांनी केलं असंही 'संरक्षण', चौघांनी स्वत:चं रक्त देऊन महिलेचे वाचवले प्राण

First published: April 5, 2020, 8:53 PM IST

ताज्या बातम्या