पटना, 05 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळताना काही वेळा अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र यातही पोलीस, प्रशासन, डॉक्टर हे लोकांच्या मदतीला धावून जात आहे. बिहारमध्ये पोलिसांनीच महिलेला स्वत:चं रक्त देऊन वाचवल्याची घटना घडली आहे. महिलेला अॅपेंडिक्सच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला रक्ताची गरज होती मात्र लॉकडाउन असल्यानं तिच्या कुटुंबियांपैकी कोणी येऊ शकलं नाही तेव्हा पोलीस मदतीला धावले. रक्त खरेदी करण्याइतके पैसे नसल्याचं व्यक्तीने पोलिसांना सांगताच चार जण रक्तदान करण्यासाठी पुढे आले. त्यांनी थेट रुग्णालय गाठले आणि युनिट रक्तदान केलं. शनिवारी शहर पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वाखाली चेकिंग सुरु होतं. त्याचवेळी एक व्यक्ती तिथं आली आणि त्याने कुटुंबातील व्यक्तीचे ऑपरेशन असल्याचं सागितलं. त्यासाठी रक्ताची गरज असून ते नाही मिळालं तर रुग्णाच्या जीवाला धोका असल्याची कल्पनाही पोलिसांना दिली. त्यानंतर ऑनड्युटी असलेल्या पवन कुमार सिंग, बबलू, शिव शंकर आणि नीरज अशा चार पोलिसांनी रक्तदान करून महिलेचा जीव वाचवला. हे वाचा : ‘एकदम लॉकडाऊन संपणार नाही, तर…’, अखेर आरोग्यमंत्र्यांनीच केलं स्पष्ट दरम्यान, या प्रकारानंतर पोलीस अधिक्षकांनी सांगितलं की, लोकांनी घरातच थांबावं आणि लॉकडाउनचं पालन करावं. तुमच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पोलिसांनी केलेल्या या रक्तदानाबद्दल संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी आभार मानले आहेत. हे वाचा : भारतात ठणठणीत बरा झालेला कोरोनाग्रस्त ब्रिटिश नागरिक म्हणाला, ‘इंग्लंडमध्ये…’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.