कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत 'या' राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश कायम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत 'या' राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश कायम

योगी आदित्यनाथ यांची अधिकाऱ्यांना तंबी, 30 जूनपर्यंत राहणार हे नियम

  • Share this:

लखनऊ, 25 एप्रिल : कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात 23 हजारहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यापैकी 17 हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी आदेशांचं पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

30 जूनपर्यंत राज्यात गर्दी जमणार नाही. याचं कटेकोरपणे पालन करण्याचे आणि ती गर्दी जमू नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असल्याचं म्हटलं आहे. जमावबंदी 30 जूनपर्यंत उत्तर प्रदेशात कायम राहणार आहे. देशभरात कोरोनामुळे 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मीडिया सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी अधिकाऱ्यांना कठोर सूचना केल्या आहेत की 30 जूनपर्यंत कोणत्याही प्रकारची गर्दी जमणार नाही. राज्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन करू शकता खरेदी? असे आहेत सरकारचे नवे आदेश

याशिवाय राज्यात कोणत्याही सभा, सर्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत असे आदेशही देण्यात आले आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने इतर राज्यात अडकलेल्या कामगारांना टप्प्याटप्प्याने परत आणण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, राज्याबाहेर काम करणारे आणि तेथे अडकलेल्या लोकांना पुन्हा टप्प्याटप्प्याने परत आणले जाईल. यासोबत राज्यातील 15 जिल्हे पूर्णपणे सील केले होते.

उत्तर प्रदेशात 348 कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. 24 एप्रिलला आग्रामध्ये 13 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर उपचार सुरू असून अत्यावश्यक कामाविना बाहेर न पडण्याचं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

हे वाचा-केरळसह या 8 राज्यांनी जिंकली कोरोनाची लढाई, 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण झाले बरे

First published: April 25, 2020, 2:52 PM IST

ताज्या बातम्या