कोरोनामुळे मृत्यू, रात्रभर कुटुंबीयांनी व्यक्त केला शोक आणि अचानक सकाळी झाला जिवंत

कोरोनामुळे मृत्यू, रात्रभर कुटुंबीयांनी व्यक्त केला शोक आणि अचानक सकाळी झाला जिवंत

रुग्णालयातील प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.

  • Share this:

संत कबीरनगर, 29 मे : कोरोनाचा संसर्ग देशभरात वाढत असताना हा संसर्ग रोखणं आणि वाढणाऱ्या सर्व रुग्णांना उपचार देण्याचं आव्हान रुग्णालय यंत्रणेसमोर आहे. अशा परिस्थितीत रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कोरोनामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगून रुग्णालयानं मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आणि अंत्यसंस्कारादरम्यान जे झालं ते पाहून पोलीस आणि कुटुंबातील सदस्यही हैराण झाले. त्यांचा मुलगा जिवंत असल्याचं समजलं

उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यात रुग्णालय प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. मथुरापूर गावातील रहिवासी असणाऱ्या तरुणाला कोरोनाची लागण झाल्यानं त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या तरुणाचा मृत्यू झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं. कुटुंबीयांनाही आधी विश्वास बसेना पण त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. रात्रभर घरातील सदस्यांमध्ये तणावाचं वातावरण होतं. शोकाकूल आणि तणावात असलेल्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला.

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं मृतदेह पूर्णपणे पॅक करण्यात आला होता. संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात आली होती. अंत्यसंस्कारादरम्यान वडिलांनी मुलाचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांच्या हट्टाखातर त्यांनी मुलाचा चेहरा दाखवला आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला.

हे वाचा-पुणे कोरोनानं हादरलं, कामगाराच्या अचानक मृत्यूनंतर आला धक्कादायक रिपोर्ट

हा तरुण त्यांचा मुलगा नसून धर्मसिंहवा पोलीस ठाणे क्षेत्रात राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं. हा तरुण काही दिवसांपूर्वी मुंबईहून उत्तर प्रदेशात आला होता. अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. हा आपला मुलगा नसून आपल्याला चुकीची माहिती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दोन्ही तरुणांवर एकाच रुग्णालयात उपचार सुरू होते. अनावधानानं एकमेकांच्या बेडच्या नावात बदल झाल्यानं हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं.

या प्रकरणी रुग्णालयानं बचावात्मक भूमिका घेत चूक कबूल कऱण्यास नकार दिल्यानं प्रशासनाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली.

या प्रकरणाचा तपास चालू असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ मोहन झा यांचे म्हणणे आहे. यासाठी एक टीम तयार करण्यात आली पण कधीकधी गोंधळ होतो. संत कबीर नगरचे 2 रुग्ण होते. रुग्णांच्या लेबलबाबत थोडासा गोंधळ उडाला.मात्र या प्रकरणी चौकशी करून आरोपीवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे.

हे वाचा-कोरोनामुळे परिस्थिती बिघडली; पोटासाठी शिक्षकावर आली मजुरीची वेळ

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 29, 2020, 8:12 AM IST

ताज्या बातम्या