Home /News /national /

कडेवर 9 महिन्यांच्या मुलाला घेऊन 1000 किमी चालणाऱ्या महिलेची कहाणी, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

कडेवर 9 महिन्यांच्या मुलाला घेऊन 1000 किमी चालणाऱ्या महिलेची कहाणी, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

तळपत्या उन्हात आपल्या चिमकल्याला कडेवर कवटाळून हातात बॅग घेऊन या महिलेनं तब्बल एक हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे.

    इंदूर, 06 मे : देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दीड महिन्यांच्या लॉकडाऊननंतर वेगवेगळ्या राज्यातील कामगार आपल्या गावी परत जाण्यासाठी निघाले आहे. काही मजूर पायी चालत निघाले तर काही मजुरांनी सरकारनं सोय केलेल्या विशेष ट्रेनमधून आपापल्या गावी जात असलेल्या ट्रेनमधून आपल्या घरी जात आहे. लॉकडाऊनमुळे या मजुरांना गुजराण करणं कठीण होत असल्यानं आपल्या गावी परतत आहेत. याच दरम्यान एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तळपत्या उन्हात आपल्या चिमकल्याला कडेवर कवटाळून हातात बॅग घेऊन या महिलेनं तब्बल एक हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे. गुजरातमधील सूरत ते इंदूर असा या महिलेनं पायी प्रवास केला. या महिलेजवळ पैसे नव्हते त्यामुळे उपाशी राहावं लागलं आणि मुलाला दूध देण्यासाठी कुठेही सहारा नव्हता. अशा परिस्थित ही महिला चालत इंदूरपर्यंत पोहोचली. इंदूरमध्ये एका संस्थेच्या सदस्याने लोकांना पाणी देत असताना हा या महिलेचा व्हिडीओ काढला होता. त्यातील हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-कोरोनाचा परिणाम, लॉकडाऊनमुळे देशातील 12.2 कोटी लोक बेरोजगार अजय गुप्ता यांनी या महिलेला मदत केली. ही घटना 9 दिवसांपूर्वीची असल्याचं सांगितलं जात आहे. दुपारी 3 वाजता बायपास रस्त्यावर पाणी देत असताना तिथे ही महिला आली. या महिलेची अवस्था आम्हाला पाहावली नाही. तिची समस्या जाणून घेत तिला मदत केल्याचंही गुप्ता यांनी सांगितलं. या महिलेच्या हातात 9 महिन्यांचं बाळ होतं आणि दुसऱ्या हातात बॅग होती. भर उन्हात ही महिला इतका पायी प्रवास करून आली होती. हातात पैसे नसल्यानं घरी पायी चालत जावं लागणार होतं. पोटात भुकेनं कावळे ओरडून ओरडून मरायची वेळ आली तरीही खाणार काय हा प्रश्न होता. महिलेची ही अवस्था पाहून अजय गुप्ता यांच्यासह काही सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली. हजार किलोमीटर चालून ती इंदूरला पोहोचली. ती सुरतहून आली होती आणि कानपूरला जायचं होतं. या महिलेला पोलिसांच्या मदतीने त्याला कानपूरला पाठवण्यात आलं. हे वाचा-गर्दी कमी करण्यासाठी दिल्लीत ‘दारु’वर 70 टक्के टॅक्स Home Deliveryही मिळणार संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Indore, Madhya pradesh

    पुढील बातम्या