मराठी बातम्या /बातम्या /देश /देशात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात? दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा कमी

देशात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात? दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा कमी

देशात कोरोनाची दुसरी लाट  (Second Wave) आटोक्यात येताना दिसत आहे. देशात (Coronavirus in India) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येताना दिसत आहे. देशात (Coronavirus in India) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येताना दिसत आहे. देशात (Coronavirus in India) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.

नवी दिल्ली, 07 जून: देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येताना दिसत आहे. देशात (Coronavirus in India) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. गेल्या 24 तासात देशात एक लाखांहून थोडे अधिक नवे रुग्ण आढळून आले. तर 2427 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे. रविवारी दिवसभरात 1 लाख 74 हजार 399 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर 61 दिवसांनंतर रविवारी एवढे कमी नवे रुग्ण देशात आढळून आलेत. (Covid-19 Latest Updates Today)

गेल्या 24 तासात एकूण नवीन रुग्ण - 1,00,636

गेल्या 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण- 1,74,399

गेल्या 24 तासात एकूण मृत्यू - 2427

देशात संसर्ग झालेल्या कोरोनाची एकूण संख्या - 2,89,09,975

देशात आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 2,71,59,180

देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या - 3,49,186

आता भारतात कोरोनाची एकूण अॅक्टिव्ह रुग्ण- 14,01,609

एकूण लसीकरण - 23,27,86,482

वरील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) सोमवारी (07 जून 2021) सकाळी 8 वाजता जाहीर केली आहे.

हेही वाचा- भारतात वितरित झालेल्या लशीसंदर्भात WHO नं दिली मोठी माहिती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 1,00,636 नवीन (New Corona Case) कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 2427 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच बरोबर, गेल्या एका दिवसात 1,74,399 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना रूग्णांचा आलेख झपाट्याने कमी होताना दिसत आहे. देशभरात आता कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ 14 लाख आहे.

देशात लसीकरण जोरात

देशात आतापर्यंत 23 कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे. 23,27,86,482 लोकांना लस देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी रविवारी 13,90,916 लोकांचं लसीकरण झालं. ICMR नुसार, रविवारी देशात 15,87,589 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर देशात आतापर्यंत 36,63,34,111 लोकांची कोरोना चाचणी झाली आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus