मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /जगभरात वितरित 2 अब्ज लशींच्या डोसपैकी 60 टक्के लशी अमेरिका, चीन आणि भारतातच वितरित; WHO ची माहिती

जगभरात वितरित 2 अब्ज लशींच्या डोसपैकी 60 टक्के लशी अमेरिका, चीन आणि भारतातच वितरित; WHO ची माहिती

जगभरातील कोविड-19 च्या परिस्थितीवर नजर ठेवून असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization WHO) शुक्रवारी आतापर्यंतचा लेखाजोखा मांडला.

जगभरातील कोविड-19 च्या परिस्थितीवर नजर ठेवून असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization WHO) शुक्रवारी आतापर्यंतचा लेखाजोखा मांडला.

जगभरातील कोविड-19 च्या परिस्थितीवर नजर ठेवून असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization WHO) शुक्रवारी आतापर्यंतचा लेखाजोखा मांडला.

नवी दिल्ली, 07 जून: जगभरातील कोविड-19 च्या परिस्थितीवर नजर ठेवून असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization WHO) शुक्रवारी आतापर्यंतचा लेखाजोखा मांडला. त्यासाठी WHO चे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसुस आणि ब्रुस अलवर्ड यांनी पत्रकार परिषद घेतली. संघटनेचे सदस्य असलेल्या देशांमध्ये सार्वजनिक आरोग्यासंबंधी उपक्रम राबवणं आणि आरोग्यासंबंधी विषयांचं नियमन करणं हे या संघटनेच्या अनेक कामांपैकी एक आहे. त्यामुळे या कामाचा आढावाही अधिकारी अधूनमधून घेतात आणि तो मांडत असतात.

पत्रकार परिषदेत अलवर्ड म्हणाले, ‘या आठवड्यापर्यंत आपण जगभरात 2 अब्ज लशींच्या डोसचं वितरण केलं आहे. बहुतेक लवकरच आपण लशींच्या वितरणाची संख्या आणि कोविड-19 च्या नव्याने विकसित झालेल्या लशींच्या संख्येच्या बाबतीत एक मैलाचा दगड गाठू. सध्याच्या 2 अब्ज लशींचे डोस 212 देशात वितरित करण्यात आले आहेत. यापैकी 75 टक्के डोस 10 देशांमध्ये वितरित झाले असून त्यापैकी 60 टक्के डोस हे चीन, अमेरिका आणि भारतात वितरित झाले आहेत. ’ मिड-डेने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

ते पुढे म्हणाले, ‘जगभरातील 127 देशात कोविड-19 लशीचे डोस पोहोचवण्याबरोबरच ज्या देशांना लशी मिळणंच आव्हानात्मक होतं अशा देशांमध्ये लशी पोहोचवून तिथलं लसीकरण सुरू करण्यामध्ये COVAX ने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एकीकडे या चांगल्या गोष्टी घडत असताना दुसरीकडे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के लोकसंख्या राहत असलेल्या गरीब देशात केवळ 0.5 टक्केच कोविड-19 लशीचे डोस पोहचले आहेत. निम्न मध्यम वर्ग राहत असलेल्या देशात लशींचं वितरण होण्याचं प्रमाण अगदी थोडं जास्त आहे.’

हेही वाचा- Breaking News: पाकिस्तानमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, 30 जणांचा मृत्यू

व्हॅक्सिनेटेड प्रवाशांसाठी फुकेट होणार खुलं

थायलंडमध्ये कोविड-19 महामारीच्या तिसरी लाटेनं भयंकर रूप धारण केलं आहे. पण थायलंडमधलं सर्वांत मोठं रिसॉर्ट आयलंड फुकेट जुलै महिन्यापासून लसीकरण झालेल्या परदेशी प्रवाशांसाठी खुलं केलं जाणार आहे, असं थायलंडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. फुकेट सँडबॉक्स या उपक्रमाअंतर्गत हे रिसॉर्ट आयलंड पुन्हा सुरू करण्यास सेंटर फॉर द इकॉनॉमिक सिच्युएशन अॅडमिनिस्ट्रेशनने शुक्रवारी झालेल्या बैठकीत परवानगी दिली आहे. लो रिस्क आणि मीडियम रिस्क असलेल्या देशांतील प्रवाशांना फुकेट बेटावर यायचं असेल तर आणि जर त्यांनी लसीकरण पूर्ण केलं असेल तर त्यांना या बेटावर आल्यावर सक्तीचा क्वारंटाइन पिरिएड माफ केला जाईल असं या उपक्रमाअंतर्गत ठरवण्यात आलं आहे.

अमेरिकेत 5 लाख नोकऱ्या

लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. पण आता हळूहळू आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. अमेरिकेतची अर्थव्यवस्था आता गती घेत आहे. सध्या अमेरिकेतील कंपन्यांना कामगार मिळत नाही आहेत. एप्रिलच्या तुलनेत नोकरी देण्याच्या प्रमाणात मे महिन्यात वाढ झाली आहे. मे महिन्यात कंपन्यांनी 54,59,000 इतके नोकऱ्या दिल्या आहेत. अमेरिकेच्या लेबर डिपार्टमेंटनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यातील नोकरी देण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून एप्रिलच्या तुलनेत मे 2021 मध्ये 2 लाख 78 हजार अधिक नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत. बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवरून खाली येऊन 5.8 टक्के झाला आहे. वेगाने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना कंपन्यांना कामगारांची गरज भासत आहे आणि त्या नोकऱ्या देत आहेत.

कोविड रुग्णांची जगातील आकडेवारी अशी

एकूण कोरोनाबाधितांची संख्या - 17,33,80,006

जगभरात झालेले कोविडमुळे मृत्यू - 37,29,181

जगभरात कोविडमधून बरे झालेले रुग्ण - 15,6153,933

First published:

Tags: China, Corona vaccine, Coronavirus