मुंबई, 21 मार्च : राज्यातल्या नागरिकांनो आता अधिक सावध व्हा. जे होऊ नये यासाठी सरकार धडपड करतं आहे, तेच संकट आता राज्यावर ओढावतं आहे. महाराष्ट्र (Maharashtra) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे, खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी याबाबत सावध केलं आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे. रुग्णांचा हा वाढता आकडा पाहता महाराष्ट्र कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो आहे, असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले. हे वाचा - महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63 वर, गेल्या 24 तासात आढळले 11 रुग्ण! महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वरुन 63 वर पोहोचली आहे. मुंबईत 10 नवीन रुग्ण आढळले आहे. तर एक जण पुण्यात आढळला आहे. मुंबईत विदेशातून आलेले 8 रूग्ण तर संसर्गातून तिघांना लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात 11 रुग्णांची वाढ झाली आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. आतापर्यंत आढळलेल्या 63 रुग्णांपैकी 12 ते 14 जणांना संर्गातून कोरोनाची लागण झाली आहे तर उर्वरित कोरोनाबाधित हे परदेशातून आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. हे वाचा - परदेशात प्रवास न करताही पुण्यातील महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आतापर्यंत परदेशातून येणाऱ्या नागरिकांमार्फत त्यांच्याशी संपर्कात येणाऱ्या रुग्णांमध्ये हा व्हायरस पसरत होता. मात्र आता पुण्यामध्ये असं प्रकरण आढळून आलं, ज्याला परदेशात प्रवास न करताही कोरोनाव्हायरसची लागण झालेली आहे. शिवाय या महिलेचा अशा कोणत्याही व्यक्तीशी संपर्क आलेला नाही. वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात कोरोना संसर्ग पसरण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीती भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात कोरोना संसर्ग पसरण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीती भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. हे वाचा - राज्यात समूह संसर्ग पसरण्याची गंभीर परिस्थिती, फडणवीसांनी व्यक्त केली भीती राज्य सरकारकडून वारंवार खबरदारीचे उपाय घेतले जात आहे. लोकांना वारंवार सूचना दिल्या जात आहे. परंतु, तरीही लोकांकडून नियमांचं काटेकोर पालन केलं जात नाहीये. त्यामुळे समूह संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांनी राज्य सरकारकडून दिलेल्या जाणाऱ्या सुचनांचं नीट पालन केलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले. कोरोना या विषाणूने भारतात दहशत पसरली आहे, याला वेळीच रोखणे सरकार पुढे आव्हान आहे. यासाठी सरकार सध्या विविध उपाययोजना करत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 22 मार्च रोजी एक दिवसासाठी ‘जनता कर्फ्यू (Janta Curfew)’ करण्याचं आवाहन केलं आहे. मोदींनी यावेळी सर्वांना एक दिवस घरात राहण्यास सांगितलं आहे. हे वाचा - Janta Curfew : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळं बंद! जाणून घ्या ‘जनता कर्फ्यू’बाबत सर्व महत्त्वपूर्ण माहिती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.