रोहतास, 27 जून : लग्नाच्या मंडपात जोडीदारासोबत सात फेरे घेऊन नव्या आयुष्याची सुरुवात करण्याआधीच ती थांबली. नवरदेवाला कोरोना झाल्यानं मंडपाऐवजी थेट क्वारंटाइन सेंटरमध्ये भरती करावं लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
बिहारच्या रायपूर इथल्या 28 वर्षीय तरुणाला कोरोना झाला. शुक्रवारी या तरुणाचं लग्न होणार होतं. लग्नाची वरात घेऊन सासरी जाण्याची तयारी सुरू होती. अंगावर नुकतीच हळद लागलेल्या नवरदेवाला पालिकेनं कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानं रुग्णवाहिकेतून क्वारंटाइन सेंटरमध्ये भरती केलं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा नवरदेव मुंबईतील एका कारखान्यात काम करत होता.
हे वाचा-चीनच्या मुजोरीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय
लॉकडाऊनमुळे कारखाना बंद झाला आणि तरूण पूर्णपणे बेरोजगार झाला. काम गेल्यानं हा तरुण आपल्या गावी परत आला. त्यानंतर 14 दिवस क्वारंटाइन सेंटरमधून घरी देखील आला. त्यावेळी कुटुंबियांनी त्याचे दोनाचे चार हात करण्याचा निर्णय घेतला.
बाहेरुन गावात येणाऱ्या लोकांची प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीनंतर हा नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं. नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं चिंता व्यक्त करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वधूच्या घरचेही रुग्णालयात पोहोचले. होणाऱ्या सासरच्या मंडळींनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालय प्रशासनानं समजूत काढून ह्या प्रकरणावर नियंत्रण मिळवलं.
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus symptoms, Coronavirus update