नवी दिल्ली, 8 एप्रिल : भारतात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकार 62 जिल्ह्यात लॉकडाउनची मर्यादा वाढवू शकतो. या जिल्ह्यांमधून कोरोना व्हायरसचे (Covid -19) 80% रुग्ण आहेत. न्यूज 18 शी बोलताना नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले की, काही राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याचे सुचविले आहे, मात्र याबाबत एक कडक रणनीती तयार केली जाईल. मुंबई कोरोना विषाणूचे केंद्र मात्र भारतातील 400 जिल्ह्यात एकही रुग्ण नाही मुंबई हे भारतात कोरोना विषाणूच्या प्रसाराचे केंद्रबिंदू झाले आहे. पुढे ते म्हणाले की, 400 जिल्हे असे आहेत जिथे कोरोना विषाणूची एकही रुग्ण सापडला नाही. ते म्हणाले की, लॉकडाऊन 14 एप्रिलपासून वाढवावे की नाही, याविषयी केंद्र आणि राज्य सरकार चर्चा करीत आहे. कुमार म्हणाले, यातून बाहेर पडण्याची रणनीती प्रामुख्याने राज्य सरकार तयार करेल आणि त्याची अंमलबजावणी करेल. जिल्हा प्रशासनाने या योजनेवर लक्ष केंद्रित करायला हवं. या प्राणघातक विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्ये यांच्यात सहकार्याची भूमिका आहे. आयुष्य आणि जगणं यांच्यात संतुलन राखूनही प्रशासनाला सामोरे जावं लागेल, असेही ते म्हणाले. संबंधित - रेल्वे अधिकाऱ्याने स्वत:च्या पैशातून गरजूंना केली मदत, CM ठाकरेंनी केलं कौतुक आतापर्यंत 50 मृत्यूनंतर लॉकडाउन मुंबईत किमान 30 एप्रिलपर्यंत वाढू शकेल दरम्यान रॉयटर्सच्या वृत्तसंस्थेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेट्रो शहर व आसपासच्या भागात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे. आतापर्यंत येथून 782 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तसंच 50 जणांचा मृत्यू झाला आहे. संबंधित - कोरोना: भारताच्या Hydroxychloroquine औषधाला जगभरात मागणी, त्याचं हे आहे कारण संपादन - मीनल गांगुर्डे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.