Home /News /mumbai /

27 एप्रिलला ठरणार लॉकडाउनचा निर्णय? मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

27 एप्रिलला ठरणार लॉकडाउनचा निर्णय? मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे.

    मुंबई, 22 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. कोरोनावर उपाय योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने कडक पावलं उचलली आहे. लॉकडाउनचा हा दुसरा टप्पा सुरू आहे. येत्या 27 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. या चर्चेत कोरोना लढ्याची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्येक राज्यात कोरोनाबाधितांचे आकडे बदलत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृतांचे प्रमाण कसे रोखता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. हेही वाचा -सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचे भाव वधारले, जाणून घ्या बुधवारचे दर पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 एप्रिल रोजी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. पंतप्रधानांनी याआधी 3 मेपर्यंत लॉकडाउनची घोषणा करत काही ठिकाणी अटी शिथिल केल्या होत्या. 20 एप्रिलनंतर निंर्बंध थोडेफोर शिथिल केले गेले.  ज्या परिसरात जास्त कोरोनाचे रुग्ण नाही, त्या भागाचे झोन तयार करून उद्योगांना अटीशर्थींवर सुरुवात करण्याची मुभा देण्यात आली होती. राज्य सरकारने ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोन अशी विभागणी करून राज्यात व्यवहार सुरू केले आहे. यात  रेड झोनमधील जिल्ह्यात बंदी कायम आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर लॉकडाउनबाबत आणि कोरोना लढ्याबाबत पुढील भूमिका ठरवली जाणार असल्याची शक्यता आहे. हेही वाचा -कौतुक करावं तेवढं थोडं! तब्बल 21 किमी धावून वेळेत ड्युटीवर पोहोचला बस कंडक्टर लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार,  पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत पत्रक जारी केले आहे. त्यानुसार, मोदींसोबतच्या या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, गृहसचिव, आरोग्य विभागाचे सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांनी हजर राहायचे आहे. याआधीही पंतप्रधानांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर देशाला संबोधित करून निर्णय जाहीर केला. संपादन - सचिन साळवे
    First published:

    पुढील बातम्या