जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनाचा विळखा : 24 तासांमध्ये तब्बल 549 नवे रुग्ण, तर 17 जणांचा मृत्यू

कोरोनाचा विळखा : 24 तासांमध्ये तब्बल 549 नवे रुग्ण, तर 17 जणांचा मृत्यू

Health workers prepare to screen residents of a building under lockdown during the Movement Control Order in Kuala Lumpur, Malaysia, Thursday, April 9, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to help curb the spread of the new coronavirus. (AP Photo/Vincent Thian)

Health workers prepare to screen residents of a building under lockdown during the Movement Control Order in Kuala Lumpur, Malaysia, Thursday, April 9, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to help curb the spread of the new coronavirus. (AP Photo/Vincent Thian)

’ 1 कोटी 7 लाख PPE सूटची मागणी नोंदविण्यात आली आहे. तर 49 हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे.'

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 09 एप्रिल : देशात कोरोनाचा विळखा वाढतो आहे. आता टेस्टिंग वेगाने होत असल्याने रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 5734 तर मृत्यूचा आकडा 166 वर गेला आहे. 473 जणांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिलीय. अग्रवाल यांनी माहिती देतांना स्पष्ट केलं की PPE सूट, मास्क आणि व्हेंटिलेटर्सचा देशांतर्गत पुरवढा सुरू झाला आहे. देशात 20 उत्पादक PPE सूटची निर्मिती करत आहेत. 1 कोटी 7 लाख PPE सूटची मागणी नोंदविण्यात आली आहे. तर 49 हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत असून आता कोरोना रुग्णांची संख्या 1297 एवढी झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे राजधानी मुंबईत अवघ्या 12 तासांत 143 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचा -  कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी असा आहे नरेंद्र मोदींचा ‘मास्टर प्लॅन’

ताज्या माहितीनुसार, पुणे, औरंगाबाद येथे प्रत्येकी 3, कल्याण डोंबिवलीध्येही 4 रुग्णांची वाढ झाली आहे. तर मीरा-भाईंदर, वसई-विरार, सिंधुदुर्ग, ठाणे, यवतमाळ या भागात प्रत्येकी एक असे एकूण 162 रुग्ण 12 तासांत वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता एकूण 1297 झाला आहे.

हे वाचा -  डॉक्टरनं शोधली भन्नाट !dea , एकाच व्हेंटिलेटरवरून 8 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा

मुंबईतील प्रतिबंधक क्षेत्रांची यादी आता 381 झाली आहे. याआधी पालिकेने दिलेल्या आकडा हा 241 जागांचा होता. याचा अर्थ असा होतोय कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मुंबईत वाढू लागले आहेत. जिथे कोरोनाबाधित रुग्ण आढळतात अशा भागाला सील केलं जातो. तिथे ये-जा पूर्णपणे बंद केली जाते. जीवनावश्यक वस्तूसाठीही लोकांना फार काळ बाहेर पडू दिलं जात नाही. त्याला प्रतिबंधित क्षेत्र असं म्हटलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात