जाहिरात
मराठी बातम्या / देश / Supreme Court : सुप्रीम कोर्टातही कोरोना धडकला, 150 जण पॉझिटिव्ह, चार न्यायाधीशांना बाधा

Supreme Court : सुप्रीम कोर्टातही कोरोना धडकला, 150 जण पॉझिटिव्ह, चार न्यायाधीशांना बाधा

Supreme Court : सुप्रीम कोर्टातही कोरोना धडकला, 150 जण पॉझिटिव्ह, चार न्यायाधीशांना बाधा

Corona enter in Supreme Court : सुप्रीम कोर्टातील एकूण 32 न्यायाधीशांपैकी चार न्यायाधीशांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच जवळपास 3000 कर्मचाऱ्यांपैकी 150 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 जानेवारी : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाचा (Delhi Corona) हाहा:कार सुरु आहे. विशेष म्हणजे देशभरात थैमान घालणारा कोरोना आता संसद (Parliament) पाठोपाठ सुप्रीम कोर्टातही (Supreme Court) दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टातील तब्बल 150 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण (Employees tested positive) झाली आहे. तसेच चार न्यायाधीशांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रीम कोर्टातील कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याने त्यांच्यासाठी उद्यापासून हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने दिली आहे. सुप्रीम कोर्टातील एकूण 32 न्यायाधीशांपैकी 4 न्यायाधीशांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच जवळपास 3000 कर्मचाऱ्यांपैकी 150 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने 2 जानेवारीला कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता 3 जानेवारी पासून दोन आठवड्यांसाठी सर्व सुनावणी डिजीटल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला होता. हेही वाचा :  देशात कोरोना वाढला, पंतप्रधानांकडून तातडीची बैठक, मोदी नेमकं काय म्हणाले? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाच्या आवारात कोरोना टेस्टची सुविधा करण्यात आली आहे. ही टेस्टिंगची सुविधी सोमवार ते शनिवार सुरु असते. याबाबत एक परिपत्रकही काढण्यात आलं आहे. “कोरोना वाढता प्रसार आणि अचानक वाढलेली रुग्णसंख्या पाहता सु्प्रीम कोर्टात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास कोरोनाची तातडीने टेस्ट करुन घ्यावी”, असं त्या परिपत्रकात म्हटलं होतं. संसदेत कोरोनाचा शिरकाव दुसरीकडे, देशातील सर्वोच्च सभागृह मानल्या जाणाऱ्या संसदेतही कोरोनाने शिरकाव केला आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढतेय. त्याचेच पडसाद आता संसदेत बघायला मिळाले आहेत. संसदेत काम करणाऱ्या तब्बल 400 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. संसदेत कोरोनाचा अशाप्रकारे हाहा:कार उडाल्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्रात तब्बल 44 हजार रुग्ण आढळले महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित (corona cases maharashtra ) रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 44,388 नवीन रुग्णाचे (corona patients ) निदान झाले आहे. तर ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या सुद्धा वाढली आहे. राज्यात एकाच दिवसात 207 नवे ओमायक्रॉनबाधित( Omicron cases) रुग्ण आढळून आहे. राज्यात कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 44,388 नवीन रुग्णाचे निदान झाले आहे. तर 12 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.04 टक्के एवढा आहे.सध्या राज्यात 10,76,996 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहे तर 2614 व्यक्ती सस्ंथात्मक क्वारटाइनमध्ये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात