Home /News /national /

ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, वैज्ञानिकांनी दिली चेतावणी

ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, वैज्ञानिकांनी दिली चेतावणी

Corona Virus Third Wave: अशातच देशातली कोरोनाची दुसरी लाट संपली नसताना तिसऱ्या लाट (Third Wave) येणार असल्याच अलर्ट देण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 04 जुलै: गेल्या वर्षीपासून कोरोना (Corona)सारख्या (Second Wave)महामारीनं जगभरात थैमान घातलं. भारत देशही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. अशातच देशातली कोरोनाची दुसरी लाट संपली नसताना तिसऱ्या लाट (Third Wave) येणार असल्याच अलर्ट देण्यात आला आहे. वेळीच कोरोना नियमांचे पालन न केल्यास येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट अत्यंत धोकादायक ठरु शकते, असा इशारा कोरोनावर देखरेख ठेवणाऱ्या वैज्ञानिकांनी दिला आहे. कोविड- 19 (Covid-19) च्या प्रकरणांच्या मॉडलिंगवर काम करणारी एक सरकारी समितीच्या वैज्ञानिकांनी ही चेतावणी दिली आहे. वैज्ञानिक म्हणाले की, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून आल्यास तिसरी लाट अत्यंत धोकादायक असू शकते. गणितीय मॉडेल्सच्या माध्यमातून कोविड -19 च्या जोखमीचा अंदाज लावणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सदस्य मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, गेल्या वेळी प्रमाणे आमचे अंदाज चुकीचे सिद्ध होऊ नये म्हणून तिसऱ्या लाटेच्या अंदाजासाठी मॉडलमध्ये आशावादी, मध्यवर्ती आणि निराशावादी या तीन शक्यतांवर चर्चा केली गेली आहे. हेही वाचा- मोठी बातमी: 48 टक्के लहान मुलांना आधीच होऊन गेला कोरोना मनिंद्र अग्रवाल यांनी म्हटलं की, तिसऱ्या लाटेचा अचूक अंदाज लावण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, लसीकरणाचे परिणाम आणि अधिक धोकादायक स्वरुप या शक्यता लक्षात घेऊन तयार केले. दुसऱ्या लाटेदरम्यान हे करता आलं नव्हतं. जर कोरोनाच्या व्हेरिएंटमध्ये कोणता बदल झाल्यास ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान कोरोना पुन्हा एकदा डोकंवर काढेल. त्यावेळी देशात 1,50,000 ते 2,00,000 पर्यंत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं अग्रवाल यांनी म्हटलं आहे. नवीन व्हेरिएंट आला तर तिसरी लाट वेगाने पसरेल. मात्र दुसऱ्या लाटेच्या तुलनेत त्याचा वेग निम्मा असेल, असंही अग्रवाल यांनी सांगितलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, Covid-19

    पुढील बातम्या