Home /News /nagpur /

नागपूरमध्ये 2 ते 6 वयोगटातील लहान मुलांची क्लिनिकल ट्रायल, लशीच्या डोसपूर्वीच अँटीबॉडीज विकसित

नागपूरमध्ये 2 ते 6 वयोगटातील लहान मुलांची क्लिनिकल ट्रायल, लशीच्या डोसपूर्वीच अँटीबॉडीज विकसित

Children Covaxin Trial Nagpur:लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू झाली आहे. लशीचा पहिला डोस देण्याआधीच स्क्रिनिंगमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

    नागपूर, 04 जुलै: कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus 2nd wave) ओसरते ना ओसरते तोपर्यंत तिसरी लाट (Coronavirus 3rd wave) येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांचा (Children) कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस (Covid vaccine) फार महत्त्वाची ठरणार आहे. याचाच एक भाग म्हणून आता भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू झाली आहे. देशभरातील एकूण चार ठिकाणी हे क्लिनिकल ट्रायल होणार असून त्यात महाराष्ट्रातील नागपूर शहराही (Nagpur, Maharashtra) समावेश आहे. शुक्रवारपासून नागपूर शहरात लहान मुलांवर (vaccine for kids) लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात झाली. दरम्यान लशीचा पहिला डोस देण्याआधीच स्क्रिनिंगमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 2 ते 6 वयोगटातील 48 टक्के लहान मुलांना आधीच कोरोना होऊन (Corona Virus) गेला असल्याचं पुढे आलं आहे. (Kids had antibodies) सध्या नागपूरमध्ये 2 ते 6 वयोगटातील मुलांची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. त्यासाठी 27 मुलांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यात 13 मुलांच्या शरीरात कोविडची अँटिबॉडीज सापडल्या आहेत. त्यामुळे या वयोगटातील अनेक मुलांना असिमटेमॅटिक कोविड आधीच होऊन गेल्याचं समोर आलं आहे. मुलांमध्ये लशीचा पहिला डोस देण्याआधीच अँटीबॉडीज (Corona Antibody) विकसित झाल्याचे स्पष्ट होत आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये 2 ते 6 वयोगटातील मुलांचं क्लिनिकल ट्रायल घेण्यात आलं. नागपूरच्या मेडिट्रेना हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सिन हे ट्रायल पार पडलं. या आधी 6 ते 12 आणि 12 ते 18 या वयोगटातील मुलांचे क्लिनिकल ट्रायल झाले. गुरुवारी या क्लिनिकल ट्रायलसाठी लागणाऱ्या मुलांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. हेही वाचा-  देशात कोरोना लसीकरणाचे 169 दिवस पूर्ण, समोर आली महत्त्वाची माहिती एकूण तीन टप्प्यात हे ट्रायल होत आहे. पहिल्या टप्प्यात 12 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणी, दुसऱ्या टप्प्यात 7 ते 11 वयोगटातील मुलांवर चाचणी आणि तिसऱ्या टप्प्यात 2 ते 6 वयोगटातील मुलांवर चाचणी होत आहे. आता याचा तिसरा टप्पा सुरु आहे. या क्लिनिकल ट्रायलमध्ये मुलांची रक्ताची तपासणी होते त्यानंतर मुलांवर क्लिनिकल ट्रायल केलं जातं. लहान मुलांना लस देण्याचे फायदे हर्ड इम्युनिटी तयार होण्यास मदत मुलांच्या लसीकरणानंतर कोरोनाचा धोका कमी कोरोना पसरण्याची शक्यता कमी संपर्कात येणाऱ्यांचा जीव वाचू शकतो
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Covid-19, Nagpur, School children

    पुढील बातम्या