मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकार करतेय 'अशी' तयारी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकार करतेय 'अशी' तयारी

देश अजूनही कोरोना व्हायरससारख्या (Coronavirus Pandemic)  महामारीचा सामना करत आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसरी लाटेची तयारी केंद्र सरकारकडून सुरु झाली आहे.

देश अजूनही कोरोना व्हायरससारख्या (Coronavirus Pandemic) महामारीचा सामना करत आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसरी लाटेची तयारी केंद्र सरकारकडून सुरु झाली आहे.

देश अजूनही कोरोना व्हायरससारख्या (Coronavirus Pandemic) महामारीचा सामना करत आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसरी लाटेची तयारी केंद्र सरकारकडून सुरु झाली आहे.

नवी दिल्ली, 14 जून: देश अजूनही कोरोना व्हायरससारख्या (Coronavirus Pandemic) महामारीचा सामना करत आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसरी लाटेची तयारी केंद्र सरकारकडून सुरु झाली आहे. केंद्र सरकार येत्या दोन ते तीन महिन्यात देशभरात 50 इनोव्हेटिव्ह मॉड्यूलर (Innovative Modular Hospitals) रुग्णालये सुरु करण्याचा विचार करत आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, मूलभूत पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी हे मॉड्यूलर रुग्णालये बांधली जातील. सध्याच्या रुग्णालयातील विद्यमान पायाभूत सुविधांचा भार (Operational Infrastructure) कमी व्हावा या उद्देशानं या मॉड्यूलर रुग्णालयांची बांधणी होईल.

रिपोर्टनुसार, आयसीच्या 100 बेड्ससोबत 50 मॉड्यूलर रुग्णालये तयार केले जातील. तीन आठवड्यात बांधण्यात येणाऱ्या या रुग्णालयांना जवळपास 3 कोटींच्या आसपास खर्च होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 6 ते 7 आठवड्यात हे रुग्णालय पूर्णपणे कार्यरत होतील. यात पहिल्या टप्प्यात बिलासपूर, अमरावती, पुणे, जालना आणि मोहालीमध्ये 100 बेड्स मॉड्यूलर रुग्णालय बनेल. रायपूरमध्ये 20 बेड्सचं रुग्णालय बनेल. तर बंगळुरूमध्ये 20, 50 आणि 100 बेड्सचं एक- एक रुग्णालय तयार करण्यात येईल.

हेही वाचा- Corona Virus: चीनच्या वुहान लॅबमधून समोर आली मोठी माहिती

महत्त्वाचं म्हणजे ही मॉड्यूलर रुग्णालय पुढचे 25 वर्षापर्यंत टिकू शकतात. तसंच एका आठवड्यापेक्षा कमी वेळेत नष्टही केले जाऊ शकतात आणि कुठंही घेऊन जाऊ शकतात.

देशाच्या विविध भागात कोविड -19 चे रुग्ण वाढल्यानं रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे मॉड्यूलर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णालयांना एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे. मॉड्यूलर रुग्णालय म्हणजे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आहे आणि आता विद्यमान रुग्णालयाच्या इमारती शेजारीच ही रुग्णालयते बांधले जाऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Central government, Corona virus in india, Coronavirus, Narendra modi