झारखंड, 14 जानेवारी: Corona in School: देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. अनेक राज्यांनी शाळा आणि महाविद्यालये (schools and colleges) बंद केली आहेत. त्यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार झारखंडमधील (Jharkhand) 39 शाळकरी मुले कोरोनाच्या विळख्यात आली आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारी 2021 रोजी झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील (Jharkhand’s Dumka district) किमान सात शाळांमधील 39 मुले कोविड (Corona Positive) पॉझिटिव्ह आल्याचं आढळून आले आहे. जामा ब्लॉकमधील चार हायस्कूलमधील 34 विद्यार्थी आणि जरमुंडी, दुमका आणि शिकारीपाडा ब्लॉकमधील इतर पाच शाळेतील मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. दुमकाचे सिव्हिल सर्जन बच्चा प्रसाद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामा ब्लॉकचे तीन शिक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. हेही वाचा- मुंबईतील Corona ची सद्यपरिस्थिती, BMC आयुक्तांनी केला ‘हा’ दावा कोरोनाची लागण झालेल्या मुलांचे वय 6 ते 18 वर्षे वयोगटातील आहे. यापूर्वी धनबाद येथील सैनिक शाळेची प्रवेश परीक्षा देण्यासाठी आलेली 21 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. परीक्षेपूर्वी केलेल्या चाचणीत मुलांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व मुलांची स्वतंत्रपणे परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील बँक मोरे येथील गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूलमध्ये सैनिक स्कूलची प्रवेश परीक्षा सुरू होती. एकूण 235 मुले परीक्षेला बसली होती. सर्व मुले इयत्ता 6वी आणि 9 वीची असल्याचे सांगितले जात आहे. मुलांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांना त्यांच्या पालकांसह होम आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, झारखंडमध्ये गुरुवारी 4,753 नवीन कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली, जी आदल्या दिवशीच्या तुलनेत 34 अधिक आहे. झारखंडमध्ये एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 3,91,526 वर गेली आहे. झारखंड सरकारने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसमुळे आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे, त्यामुळे मृतांची संख्या 5,184 झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.