नवी दिल्ली, 03 सप्टेंबर: सध्या देशात कोविड लसीकरण (Corona Vaccination in India) वेगानं सुरू आहे. आतापर्यंत, देशातील 16 टक्के ज्येष्ठ लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालं आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांमध्ये कमी लसीकरण होणं, हे प्राणघातक ठरू शकतं. तिसऱ्या लाटेच्या (Corona Virus 3rd wave) पार्श्वभूमीवर, अनेक राज्यांत लसीकरणाची आकडेवारी चिंतेचं कारण ठरत आहे. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांत 60 वर्षांवरील लोकांची संख्या जास्त आहे. ओआरएफ कोविड व्हॅक्सिन ट्रॅकरच्या मते, 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या दर 1000 लोकसंख्येत लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या खूप कमी आहे. ORF ने 27 ऑगस्टपर्यंतच्या कोविड लसीकरणाच्या डेटाचं विश्लेषण केलं आहे.
देशात, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या एक हजार लोकांपैकी 947.13 लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये हा आकडा 523.05, उत्तर प्रदेशात 651.12 आणि पश्चिम बंगालमध्ये 853.48 इतका आहे. या तिन्ही राज्यांमध्ये 60 वर्षांवरी अधिक वयोगटातील लोकांची संख्या एक कोटीहून अधिक आहे. महाराष्ट्रात 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांची संख्या 1.45 कोटी आहे, परंतु याठिकाणी दर एक हजार लोकांपैकी 951.12 लोकांना डोस देण्यात आले आहेत. हा आकडा राष्ट्रीय सरासरीपेक्षा काहीसा जास्त आहे.
हेही वाचा-गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांची नियमावली; वाचा संपूर्ण नियम नाहीतर होईल कारवाई
तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांत ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे याठिकाणी लसीकरणाचं सरासरी प्रमाण वाढलं नाही, तर कोरोना विषाणूची तिसरी लाट या राज्यांत प्राणघातक ठरू शकते. ORF च्या विश्लेषणानुसार, 27 ऑगस्ट पर्यंत, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 61.6 टक्के लोकसंख्येला किमान एक डोस मिळाला आहे. तर 31.4 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
हेही वाचा-.....तरच लोकांना एकत्र जमता येईल; सणासुदीच्या कालावधीत मोदी सरकारची मोठी घोषणा
लहान राज्यांत लसीकरण अधिक
सिक्कीम, मिझोराम, लक्षद्वीप, चंदीगड आणि अंदमान-निकोबार या सारख्या छोट्या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत लस घेतलेल्या 60 वर्षांवरील वयोगटाची संख्या तुलनेनं अधिक आहे. लसीकरण पूर्ण होणं वृद्धांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण या वयातील लोकांना अन्य दीर्घ स्वरुपाचे आजार देखील असू शकतात. त्यामुळे अशा लोकांना कोरोना संसर्ग होणं खूप असुरक्षित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.