मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांची विशेष 13 पथकं तयार, मास्क न घालणाऱ्यांवर होणार कारवाई

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांची विशेष 13 पथकं तयार, मास्क न घालणाऱ्यांवर होणार कारवाई

गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2021) अवघा आठवडा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्व पोलीस (Mumbai Police Stations) स्टेशनना सतर्क राहावे, असे आदेश देण्यात आलेत.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 02 सप्टेंबर: सप्टेंबर-ऑक्टोबर याकालावधीत कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) तिसऱ्या लाटेचा (Third Wave) इशारा देण्यात आला आहे. अशातच गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2021) अवघा आठवडा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्व पोलीस (Mumbai Police Stations) स्टेशनना सतर्क राहावे, असे आदेश देण्यात आलेत. गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) सज्ज आहेत. पोलिसांनी गणेशोत्सवानिमित्त काही नियम आखले आहेत. या नियमांचं जो पालन करणार नाही त्यांच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई करणार असल्याचंही समजतंय.

मुंबई पोलीस येत्या गुरुवारपासून मास्क न घालून रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करणार आहेत. सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्यात. यावेळी सूचना देताना त्यांनी सांगितलं की, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मास्क न घालून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी.

कोविन अ‍ॅप हॅक करुन घेतलं प्रमाणपत्र, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन

भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी असं आवाहन मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना केलं आहे. तसंच भक्तांना मंडपात येऊन दर्शन घ्यायचं असेल तर अशा भक्तांसाठी टोकन यंत्रणेची व्यवस्था करावी. जेणेकरुन भक्तांची जास्त गर्दी होणार नाही, असं आवाहनही मुंबई पोलिसांनी मंडळांना केलं आहे.

पोलिसांची पथकं तैनात

गणेशोत्सवानिमित्त मुंबईत पोलिसांची एकूण 13 विशेष पथकं तैनात करण्यात येणार आहेत. या पथकांमध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 1 एपीआय, 2 पीएसआय असे 11 कॉन्स्टेबल असणार आहेत. मुंबईत एकूण 13 झोन असून प्रत्येक झोनमध्ये एक पथक तैनात असेल. हे पथक झोनमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवेल.

20 मिनिटांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांच्या जावयाची सुटका

बुधवारी विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्वांना गणेशोत्सवासंदर्भातल्या सूचना दिल्या आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai police