मराठी बातम्या /बातम्या /देश /'कोरोनाची पहिली लस पंतप्रधान मोदींनी घ्यावी, मग आम्ही घेऊ'

'कोरोनाची पहिली लस पंतप्रधान मोदींनी घ्यावी, मग आम्ही घेऊ'

'मी कोरोना लस घेणार नाही कारण कारण मला भाजपवर विश्वास नाही', असं धक्कादायक विधान यापूर्वी अखिलेश यादव यांनी देखील केलं होतं.

'मी कोरोना लस घेणार नाही कारण कारण मला भाजपवर विश्वास नाही', असं धक्कादायक विधान यापूर्वी अखिलेश यादव यांनी देखील केलं होतं.

'मी कोरोना लस घेणार नाही कारण कारण मला भाजपवर विश्वास नाही', असं धक्कादायक विधान यापूर्वी अखिलेश यादव यांनी देखील केलं होतं.

  पाटणा, 08 जानेवारी : देशभरात दुसऱ्यांदा 700 जिल्ह्यांमध्ये कोरोना लशीचं ड्राय रन सुरू आहे. 13 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाण्याची शक्यता असतानाच एका नेत्यानं मोठं विधान केलं आहे. कोरोनाची लस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली घ्यावी आणि त्यानंतर आम्ही घेऊ असं RJD नेत्यानं सांगितलं आहे.

  विरोधी पक्ष नेते कोरोना लस लवकरात लवकर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी भाजपवर टीका करत आहे. या अनुषंगाने बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि RJD नेते लालू यादव यांचे मोठे सुपुत्र तेज प्रताप यादव यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची पहिली लस घ्यावी त्यानंतरच आम्हाला ही लस घेऊ असं विधान त्यांनी केलं आहे. याआधी देखील उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही कोरोना लस मिळण्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.

  हे वाचा-Corona vaccine घेतल्यानंतरही कोरोना  संसर्गाचा धोका आहे का?

  RJD नेता माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही कोरोना लसीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लखनौमध्ये सांगितले की, मी कोरोना लस घेणार नाही कारण कारण मला भाजपवर विश्वास नाही. टाळ्या आणि थाऴी वाजवणारं सरकार लसीकरणासाठी एवढी मोठी साखळी का तयार करत आहे. टाळ्या आणि थाळी वाजवून कोरोनाला पळवून लावा असा आरोप अखिलेश यादव यांनी भाजपवर केला आहे.

  देशभरात कोरोना लशीचं वॅक्सिनेशन विना अडथळा पूर्ण व्हावं यासाठी आधी ड्रायरन राबवलं जात आहे. याआधी 28 आणि 29 डिसेंबरला 4 जिल्ह्यांमध्ये तसंच 2 जानेवारीला 285 जिल्ह्यांमध्ये ड्राय रन घेण्यात आली होती.कोरोना लस मंजूर झाल्यानंतर सरकारने वाहतुकीची तयारीही पूर्ण केली आहे. वायुमार्गाद्वारे लसींच्या हालचालीसाठी सरकारने पूर्ण आराखडा तयार केला आहे.

  साधारण 13 जानेवारीपासून देशभरात कोव्हिड 19 च्या लसीकरणास सुरुवात होऊ शकते. दरम्यान या लसीकरणाबाबत सर्व माहिती CoWIN अ‍ॅपवर उपलब्ध करण्यात येईल, या अ‍ॅपच्या माध्यमातून कोरोना व्हॅक्सिनसाठी फ्री रजिस्ट्रेशन करू शकता.

  First published:

  Tags: Pm narendra mdi