नवी दिल्ली, 04 जुलै: देशात कोरोनाचा
(Corona Virus) प्रसार रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट
(Second Wave) आटोक्यात येत असताना तिसऱ्या लाटेचा
(Third Wave) धोका वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना लसीकरण वेगानं सुरु आहे. कोरोना लसीकरणाची
(Corona Vaccination) मोहिम राबवण्यात येत आहे. अशातच देशात कोरोना लसीकरणाचे 169 दिवस पूर्ण झालेत. या दिवसात देशात 35 कोटी लसीचे डोस देण्यात आलेत.
16 जानेवारीपासून सुरु झालेल्या व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह अंतर्गत आतापर्यंत कोरोना व्हॅक्सिनचे एकूण 35 कोटी डोस लावण्यात आले. भारतानं केवळ 169 दिवसांत हा आकडा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या डेटानुसार आतापर्यंत 35.05 कोटी लसीचे डोस देण्यात आलेत.
केवळ शनिवारी 57.36 लाखांहून जास्त लोकांनी लसीकरण केलं आहे. यात 18 ते 44 वर्षांपर्यत 28.33 लाख लोकांनी पहिला आणि 3.29 लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोविन पोर्टलनुसार, शनिवारी रात्री 11 वाजेपर्यंत 63.39 लोकांनी आतापर्यंत लोकांनी कोरोना लस घेतली आहे.
हेही वाचा- पुण्यात MPSCची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्निलची थक्क करणारी सुसाईड नोट
18-44 वर्षांचे 10 कोटींहून जास्त लोकांचं व्हॅक्सिनेशन
37 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात या वयोगटातील 10.21 कोटी लोकांनी पहिला डोस घेतला आहे. आठ राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राज्यस्थान, तमिळनाडू, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रात हा आकडा 50 लाखांहून अधिक आहे.
याव्यतिरिक्त आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 18 ते 44 वयोगटातील 10 लाखांहून अधिक लोकांनी लस घेतली आहे.
दरदिवशी एक कोटींचं लक्ष्य
देशात तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. अशात सर्वांच्या व्हॅक्सिनेशनसाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी आहे. येणाऱ्या दिवसात प्रत्येक दिवशी 1 कोटी डोस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.