नवी दिल्ली, 28 डिसेंबर: देशातील कोरोना व्हायरसचा (Corona Virus) प्रार्दुभाव पूर्णपणे रोखण्यासाठी सरकारनं आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (CDSCO), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत, कोविड -19 लसी कोवोव्हॅक्स आणि कॉर्बेवॅक्स (Covovax-Corbevax Vaccines Approved) आणि अँटी-व्हायरल औषध मोलनुपिरावीरच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. ट्विट करत आरोग्य मंत्र्यांनी देशाचे अभिनंदन केलं आहे. ट्विटमध्ये आरोग्य मंत्री म्हणाले की, मोलनुपिरावीर हे कोविड-19 च्या प्रौढ रूग्णांवर उपचार करण्यासाठी देशातील 13 कंपन्यांनी विकसित केलेले अँटीव्हायरल औषध आहे. जे आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी उत्पादित केले जाईल.
Congratulations India 🇮🇳
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) December 28, 2021
Further strengthening the fight against COVID-19, CDSCO, @MoHFW_INDIA has given 3 approvals in a single day for:
- CORBEVAX vaccine
- COVOVAX vaccine
- Anti-viral drug Molnupiravir
For restricted use in emergency situation. (1/5)
पुढे आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं की, Corbevax ही भारतातील पहिली ‘RBD प्रोटीन सब-युनिट लस’ आहे. हे हैदराबादस्थित कंपनी बायोलॉजिकल-ईनं (Biological-E) बनवले आहे. ‘ही हॅट्ट्रिक आहे! आता ही भारतातील तिसरी लस बनली आहे.’ नॅनोपार्टिकल लस (Nanoparticle Vaccine) कोवोव्हॅक्स पुण्यातील कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (Serum Institute of India)तयार केली जाईल.
Molnupiravir, an antiviral drug, will now be manufactured in the country by 13 companies for restricted use under emergency situation for treatment of adult patients with COVID-19 and who have high risk of progression of the disease. (4/5)
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) December 28, 2021
मोलनुपिराविर देशात तयार होणार आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले की, व्हायरसविरोधी औषध मोलनुपिरावीर (Molnupiravir Medicine) आता देशातील 13 कंपन्यांमध्ये बनवले जाईल. जे कोविड-19 च्या प्रौढ रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी दिले जाईल. ज्यांना हा आजार होण्याचा धोका जास्त असेल त्यांनाच हे औषध उपलब्ध असेल. हे औषध कोविड-19 विरुद्ध अत्यंत प्रभावी मानले जाते. संशोधनात असे दिसून आले आहे की, ज्या रुग्णांना मोलनुपिराविर हे औषध देण्यात आले होते, त्यांना 14 दिवसांच्या निरीक्षणादरम्यान प्रमाणित काळजी घेतलेल्या रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता खूपच कमी होती. ओमायक्रॉनची 653 प्रकरणे विशेष म्हणजे, कोविड संसर्गाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यासाठी देशात लसीकरणाची प्रक्रिया वेगवान केली जात आहे. या भागात लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनची 653 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 186 बरे झाले आहेत किंवा परदेशात गेले आहेत. हेही वाचा- वरातीची वाट पाहत होती वधू, अन् एक मेसेज आल्यावर सरकली पायाखालची जमीन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीत मंगळवारी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रात ओमायक्रॉनची सर्वाधिक 167 प्रकरणे आहेत. यानंतर दिल्लीत 165, केरळमध्ये 57, तेलंगणात 55, गुजरातमध्ये 49 आणि राजस्थानमध्ये 46 रुग्ण आढळले आहेत.