नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) नियंत्रणात आली आहे. मात्र येत्या काळात संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका असल्याचा इशारा देण्यात आला. त्यासाठी देशात लसीकरणाचा (Corna Vaccination) वेगही वाढवण्यात आला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोहिम वेगानं सुरु असल्याचंही केंद्र सांगत आहे. मात्र अशातच एक माहिती समोर आली आहे. भारतातील किमान 1.6 कोटी नागरिकांना त्यांच्या कोरोना लसीच्या पहिल्या डोसच्या 16 आठवड्यांनंतरही लसीचा दुसरा डोस मिळणे अद्याप बाकी असल्याचं समजतंय.
देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 58.82 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यामधील पहिला डोस घेतलेल्या किमान 1.6 कोटी लोकांना 16 आठवड्यांच्या आत दुसरा डोस मिळाला नसल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. दुसरा डोस बाकी असलेल्यांमध्ये एक कोटीपेक्षा जास्त वृद्ध आहेत. बाकीचे इतर आरोग्य आणि फ्रंन्टलाईन कर्मचारी आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे आहेत.
सर्व आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून समोर आली आहे. 1.6 कोटींचा हा आकडा 2 मे, म्हणजे 16 आठवड्यांपूर्वी किती लोकांना पहिला डोस मिळाला होता हे बघून आणि त्यानंतर आतापर्यंत दुसरा डोस मिळवलेल्या एकूण लोकांशी तुलना करून काढण्यात आला आहे.
नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया
सरकारने 13 मे रोजी कोविशिल्डसाठी 12-16 आठवड्यांचे अंतर ठेवण्याची परवानगी दिली होती. कोव्हॅक्सिनसाठी हे अंतर 4 ते 6 आठवडे असा आहे. ज्या लोकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर निर्धारित मुदतीपेक्षा जास्त आहे. त्यांची संख्या अधिक असू शकते. कारण कोविशील्डसाठी 16 आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. 12 आठवड्यांनंतर आणि अद्याप पूर्णपणे लसीकरण झाले नाही. अशा दुसर्या डोससाठी पात्र असलेल्या लोकांची संख्या 3.9 कोटी आहे. दरम्यान ही संख्या जास्त असू शकते कारण कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशील्डसाठी (12 आठवडे) किमान अंतर चार आठवडे आहे.
आरोग्य सेवा आणि फ्रंन्टलाईन कर्मचारी गटांतील, 45-59 वर्षे आणि 60 वर्षांवरील 128 कोटी व्यक्तींना 2 मे रोजी पहिला डोस मिळाला होता. यापैकी 11.2 कोटींना दुसरा डोस मिळाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.