जाहिरात
मराठी बातम्या / देश / लवकरच AIIMS मध्ये भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल होणार सुरु, नाकाद्वारे देणार डोस

लवकरच AIIMS मध्ये भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल होणार सुरु, नाकाद्वारे देणार डोस

लवकरच AIIMS मध्ये भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल होणार सुरु, नाकाद्वारे देणार डोस

कोरोना व्हॅक्सिन (Corona Vaccine) संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 सप्टेंबर: कोरोना व्हॅक्सिन (Corona Vaccine) संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. भारत बायोटेकची (Bharat Biotech) नेजल व्हॅक्सिनच्या (Nasal Spray Vaccine) दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजमधील क्लिनिकल ट्रायल अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS)मध्ये लवकरच सुरु होणार आहे. गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये कंपनीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी (clinical trial) नियामक मान्यता मिळाली होती. ही व्हॅक्सिन नाकाव्दारे दिली जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही व्हॅक्सिन अधिक प्रभावी ठरणार आहे. पहिल्या टप्प्यातील निकाल ही व्हॅक्सिन BBV154 आहे. ज्याचे तंत्रज्ञान सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठातून भारत बायोटेकने प्राप्त केले आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलमध्ये निरोगी स्वयंसेवकांना देण्यात आलेल्या व्हॅक्सिनचे डोस मानवी शरीरानं चांगल्या पद्धतीनं स्विकारले आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीकडून बॉयफ्रेंडची गळा दाबून हत्या तसेच कोणतेही गंभीर प्रतिकूल परिणाम झाले नाहीत. प्री क्लिनिकल अभ्यासतही ही व्हॅक्सिन सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. प्राण्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासात ही व्हॅक्सिन अॅटीबॉडीजचा उच्च स्तर तयार करण्यात यशस्वी झाली आहे. ही व्हॅक्सिन किती प्रभावी शास्त्रज्ञांच्या मते, ही नेजल व्हॅक्सिन नाकातील म्यूकस मैंबरेनचं संरक्षण करेल. ज्याप्रमाणे पोलिओचे ओरल ड्रॉप देतात त्याचप्रमाणे हे व्हॅक्सिन असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात